पिठमांग्या’ म्हणे इकास म्हणजे का होते गा ‘भीकमांग्या’ भाऊ?

पिठमांग्या’ म्हणे इकास म्हणजे का होते गा ‘भीकमांग्या’ भाऊ?



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_इकासापासून कोसोदूर फक्त चर्चा_

आपल्या गावी असू द्या नाही तं शहरात असू द्या…. राज्यात असू द्या नाहीतर देशात असुद्या…. इलेक्शनच्या गोंधळ वेगळाच असतो या… गावाच्या जुन्या मवेशी दवाखान्या जवळच्या पानठेल्यात बसल्या-बसल्या पीठमांग्या आपल्याजवळील खर्रातली सुपारी कांडरत भिकमांग्या सोबत बोलू लागला. दोघातील संवाद फारच रंगात आला होता… पीठमंग्यानं भिकमांग्याले नकारार्थी मान हलवत उत्तर देल्लनं… तो म्हणाला पीठमांग्या तुझं म्हणणं खरं हाय…. अन् खरां असलं तरी विकासाच्या केवळ गप्पा होत्यात… बघ…! आपल्या क्षेत्राचं बघ… आहे का इकास… इकासाच्या नावावर निव्वळ भोपाल्या आहेत इथं…. पण करा लागते भोपाल्या भाऊ… ज्या शहराच्या नावानं आपला लोकसभा क्षेत्र ओळखला जातो…. त्या शहराचा तरी इकास झाला आहे का..? त्या शहरात एक हॉटसप गुरुप आहे… तो गुरुप तं चांगलीच बॅनरजीवी नेत्यांची इकासावर पोलखोल करत आहे.. आता बघ पीठमांग्या तु ही काही कमी चालबाज नाहीस…. आता पीठमांग्या माझा आईक… त्या शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धानाचा प्रश्न, वाढीव विज बिलचा प्रश्न…. हे प्रश्न म्हणजे मज्याक झाला हाय… आपल्या भागातल्या लोकांचं, मतदारांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न राह्यले बाजूले.. आणि सर्वच पक्षाचे गावनेते, पुढारी एकमेकांवर लईच खालच्या पातळीवर बोलू लागल्ये… ह्ये म्हणजे लोकसभेच्या निवडणूकीत असचं दिसू लागल हाय बे… यावर खरी की खोटं… की काय आता जिल्ह्याचा खास दार बदलाची चूणूक इथूनच दिली गेलीय अस वाटत्ते.

पीठमांग्या व भिकमांग्याचं बोलणं ऐकत गावातील चौकातील आजूबाजूचे लोक चर्चेत सहभागी झाले…. नित्या म्हणाला, आपलाच उमेदवारच निवडून येणार… तर परकाश्यान हळूच पुडी सोडली… आमच्या क्षेत्रातून आम्ही लई मोठा लीड देणारचं…. ही चर्चा रंगत असतानाच परकाश्याच्या सोडलेल्या पुडी ने दादाले मानणारा कार्यकर्ता आला…अन् खसखस चर्चेत रंगू लागली आणि त्यांना थेट चर्चेत सहभाग नोंदवला…. दादाचं भाषण कसं रंगलं होतं मेळाव्यात.. दादा नेहमीच बोलत्यात भारी.. त्यावर पीठमांग्या तुटून पडला अरे लेका इकासाच्या गप्पा चालल्यात… तुझा तो पार्सल दादा बोलतूया लई भारी..अन् त्यान आपली पातळीच सोडलीया की… त्यान हरेक गावच्या गावानेत्याला चोराची व सोताला महाचोराची उपमा दिलीया.. बस्सं करायचं कि देव्या… सोळ दुने आठ अन् चले हिंगणघाट अशी अवस्था आहे बघ नित्या तुजी… भिकमांग्या सारखा कार्यकर्त्ताबी ठसक्यात बोलला… पुढारी दादा अन् भाऊ काय आन् तो आमुचा बॅनरजीवी नेता काय नुसतं नौटंकी करतेत हे नेते… समदी नेतेमंडळी खालच्या पातळीवर बोलू लागली हायेत… ही कसली आली निवडणूक… एकमेकांची उणी दुणी काढण्यातच लोकसभेच्या निवडणुकीत ही नेतेमंडळी पुढं येऊ लागलीत… चर्चेत आता गंभीर वळण घेतलं होतं… तवा निव्वळ भूमिपूजन करणाऱ्या नेत्यानं तेल ओतलंच… कोरोनाचा कहर होत आसताना त्ये नेते तर मास्कबी नाय घालत म्हणू लागलयं…. लोका सांगे… त्यावर पीठमांग्या म्हणाला, तो तुमचा पोपटलाल भाऊची व दादाची बातमी पेपरात फोटूसकटत लावण्यासाठी कसा वाकू वाकू बिना मास्कनं फोटू काढतो… तवा कोटी जाते तुमचं ब्रम्हज्ञान… यावर भिकमांग्या मिश्कीलपणे हसला तर पीठमांग्या म्हणाला, मी इथं क्षेत्राच्या इकासावर बोलतुया अन् तुम्ही नेत्याच्या फोटोसेशनवर चर्चा करु लागल्या…आपल्या भागातील प्रश्नावर कवा निवडणुक हुणार? सर्वांनाच अनुत्तरीत करणारा प्रश्न चर्चेत आला अन् देव्यानं टपरीवर चहासाठी आॕर्डर दिली. टपरीवर चहा पिऊन मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सगळे कार्यकर्ते आपापल्या नेत्याचा प्रचार लोकसभा निवडणुकीत कसा करायचा या विचाराने आपआपल्या घराकडे निघाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles