बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट नऊ🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : धुंदीत राहू🥀*
*🍂बुधवार : ०३ / एप्रिल /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*धुंदीत राहू*

वसंताची हळूच चाहूल
आली भिरभिरत अंगणी
वनराईला बहर आलीत
चौफेर सजली हि धरणी.

निसर्ग सौंदर्य पाहण्या
टकमक रम्य दृष्य पाहू
आनंदाने नाचत गाजत
बेभान धुंदीत राहू.

सख्या सजना सवे
मनसोक्त आनंद लुटू
बिनधास्त पणे होऊन
मनातले भाव वाटू.

एकमेकांना समजून
ह्रदयातील भाव जाणुन घेऊ
ओठावरील आलेले अबोल शब्द
एकमेकांना पटवून देऊ.

*सौ पुष्पा डोनीवार, चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💐📘💐➿➿➿➿
*धुंदीत राहू*

धुंदीत राहू आज
प्रेमाच्या गावी जाऊ
ये लवकरी प्रीतफुला
प्रेमाची गाणी गाऊ ||१||

प्रेम आपले निरपेक्ष
त्यासी उपमा नाही
मी तुझा अन् तू माझी
दुसरे नकोच काही ||२||

धुंदी या प्रेमाची
चढली जणू नशा
प्रेमरंगी रंगलो आता
उरली न काही आशा ||३||

आपल्या या प्रेमाला
नजर लागू नये
एकमेकांसाठीच आपण
वेगळे होऊ नये ||४||

धुंदीत आज आपण
करू मजेत विहार
गैरसमजाच्या वादळाची
नकोच व्हावया शिकार ||५||

धुंदीत राहू आपण
पाहू स्वप्ने भविष्याची
जुळतील रेशीम गाठी
साद भावी आयुष्याची ||६||

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
*ता.कर्जत जि.रायगड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐📘💐➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*धुंदीत राहू*

एक वार्‍याची झुळूक व्हावे
आईच्या मिठीत रमून जावे
बाबांशी हितगुज करूनी
अशांत मन शांत शांत करावे….

एक वार्‍याची झुळूक व्हावे
दर्‍या खोर्‍यात मस्त हुंदडावे
पाना फुलांना स्पर्श करुनी
आनंदाने गगनी विहरत राहावे….

एक वार्‍याची झुळूक व्हावी
चांदोबाला स्पर्श करायला जावे
चांदण्याच्या रांगोळीत मनसोक्त
स्वर्गीय सुख हे अनुभवावे….

एक वार्‍याची झुळूक व्हावे
नीलवर्णी गगनी धूंदीत राहावे
उंचावरून दिसणारे सृष्टीसौंदर्य
या मृगनयनी साठवून घ्यावे……

*वसुधा वैभव नाईक,पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐📘💐➿➿➿➿
*धुंदीत राहू*

छेडल्या तारा हृद्यीच्या
नाते जुळले भावनांचे,
धुंदीत राहू प्रेमानं गाऊ
गीत सख्या जीवनाचे…!

पडला तुझाचं प्रभाव
जागृत झाला प्रेमभाव,
केलास तूही प्रेमवर्षाव
घेतला मी मनीचा ठाव…!

जगणे नको तुजवीण
नात्यात गुंतलेय अशी,
क्षणभर मज करमेना
एकाकी मी राहू कशी…!

जीव रमलाय तुजसवे
प्रेमरंगी अशी रमते मी,
सप्तसुराच्या सप्तरंगी
बेभान होवून जाते मी…!

मागणे ना मज काही
तव् सुखात सुख पाहे,
प्रीततराणे ओठावरती
सदैव गुणगुणत आहे…!

छंद लागला तुझा मज
मी समर्पण तुज आहे,
धुंदीत राहू, मस्त गाऊ
मनोकामना मज आहे…!

*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐📘💐➿➿➿➿
*धुंदीत राहू*

कुढत मानवा जगू नको
मुक्त होण्या लाजू नको
संवादाची साथ सोडू नको
व्यक्त होण्या टाळू नको

चुका होतीलही कदाचित
पुतळाच तु चुकीचा
माफी मागण्या लाजू नको
हतबलता मनी धरू नको

तुज आहे तुजपाशी
उगा शोधतो इतरापाशी
स्वजागृती करण्यासाठी
दे ललकारी उभारणीसाठी

जगणे आहे सोपे बघ
दृष्टी बदल करून बघ
स्वआयुष्याचा होशील राजा
धुंदीत राहून घेशील मजा

जीवन गाणे धुंद तराने
धुंदीत राहू मस्तीत गाऊ
जीवना नवाकार देऊन
नवरंग जीवनात उधळू

*प्रा. अर्चना कृष्णराव सुदामे*
*छत्रपती संभाजीनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐📘💐➿➿➿➿
*धुंदीत राहू*

उचलून लेखणी करू या पूजन शब्दांचे
गुंफुनी माळा कल्पनेच्या सजवू या अंगण काव्याचे

कित्येक वर्षात लाभला आज तुझा निवांत संग
काव्य माझे आले फुलून अन सुरात झाले दंग

मोगऱ्यातला सुवास तुझा, झाले मी बेधुंद
धुंदीत राहू आता उठतील मन मंदिरात तरंग

आठवणींच्या पावसात गाऊ मनाच्या अंतरीचे गीत
ओलावा काव्यातील शब्दांचा तयात भिजून जाईल प्रीत

स्वप्नांच्या या जगात घेऊन हातात हात
धुंदीत राहू मस्तीत गाऊ फुलवू मनी वसंत

*सौ अनिता व्यवहारे*
*ता श्रीरामपूर जि अहमदनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐📘💐➿➿➿➿
*धुंदीत राहू*

सख्या हा अल्पकाळ
असे यौवनाचा
का रे हा दुरावा
बहर तारूण्याचा

का तुझे माझे
नियमित बिघडणे
माझ्या अपेक्षांवर
पाणी तुझे सोडणे

मीही स्वाभिमानी
वाकणार कशी
या ओढाताणीत
दूर तू जाशी

सहवास हवा
प्रेम वाढावया
ये वायूवेगे
मज भेटावया

दूर मी जाता
नको पाणी लावू
आधीच सांगणे हे
धुंदीत राहू

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐📘💐➿➿➿➿
*धुंदीत राहू*

चैत्र पालवीच्या धुंदीत राहू
म्हणून घालू नकोस रे गळ
पाणगळतीच्या रे घावातून
दुःखाश्रू वाहिले रे भळभळ

सावलीत रे विसावण्याची
पशु-पक्ष्यांनाही होते रे घाई
उन्हात सावली रे देणारी
बनावी वाटते मलाही आई

उघडे बोडके पाहून रे रूप
तळमळ वाटसरूंची रे होई
संपून जाई माझा रे हुरूप
पदर कसा ठेऊ तुम्हां डोई

वसंत ऋतूच्या प्रेमस्पर्शाने
मोहरले माझे कसे तन मन
चैत्रपालवी फुटलीय हर्षाने
निर्व्याज प्रेम देते निसर्गधन

वृक्षच रे झाली कमी हल्ली
उदास ओटे सुख ना मनाला
चिंताग्रस्त लोकं गल्लोगल्ली
निश्चय करावा रे या क्षणाला

एक मूल एक झाड संस्कृती
मातीत वाढविणार प्राणदाते
वृक्षतोडीत नफा हीच विकृती
वृक्ष नि श्वासाचे जाणावे नाते

वृक्ष नि श्वासाचे जाणावे नाते

*श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐📘💐➿➿➿➿
*धुंदीत राहू*

धुंदीत राहू स्वतःच्याच
वेळ न दुसरीकडे पाहायला
छंद जोपासू नवे नवे
आकार मिळेल जीवनाला

करू पुस्तकांशी मैत्री
नित्य नवे मिळवू ज्ञान
वर्तमानपत्र वाचत बसू
पळून जाईल अज्ञान

चारोळी,कविता करू रोज
कल्पनाशक्तीला वाव देऊ
बालमनाच्या बालकविता
काव्य जगतात हरवून जाऊ

चित्र काढू रंगीबेरंगी
वाचन, लेखन,खेळ,व्यायाम
सुट्टीचा आनंद मनमुराद लुटू
जगण्याला देऊ नवा आयाम

*सौ.शशी मदनकर ,ब्रम्हपुरी चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐📘💐➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles