आंबेडकरी मतदानाचे विभाजन टाळण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला लोकसभा निवडणुकीत समर्थन बागडे –

आंबेडकरी मतदानाचे विभाजन टाळण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला लोकसभा निवडणुकीत समर्थन
बागडे –



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: संविधानाला खुलेआम विरोध, महागाई, खाजगीकरण, आरक्षणाचा विरोध अल्पसंख्याकांचे खच्चीकरण, देशाचे भवितव्य इत्यादी बाबींचा विचार करून आंबेडकरी रिपब्लिकम योर्चा ने संपूर्ण राज्यात राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला लोकसभेच्या निवडणुकीत जाहीर पाठिंबा दिला आहे.

काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांना प्रत्यक्ष भेटून पाठिंबा जाहीर करण्यात आला. आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा ने राज्यातील १९ मतदारसंघात उमेदवार लढविण्याचे घोषित केले होते. आंबेडकरी मतदानाचे विभाजन नको म्हणून उमेदवारांची नावे मागे घेण्यात आली या निर्णयाचे स्वागत आंबेडकरी समाजाने तसेच पुरोगामी विचारांचा लोकांनी केले आरिमो ने दिलेल्या समर्थनाने संपूर्ण राज्यातील आंबेडकरी समाजात आनंदाची लाट उमटली आहे. आता आंबेडकरी मताचे विभाजन थांबणार असून काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडणुकीत विजयी होतील असे पत्रपरिषदेत बागडे यांनी सांगीतले.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची नागपूर मुक्कामी भेट घेवून मताचे विभाजन टाळण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने समर्थनाचा प्रस्ताव दिला आहे परंतु अद्याप त्यांच्या कडून रिपब्लिकन मोर्चाला समाविष्ट करून घेण्यासाठी सूचना आल्या नाहीत. त्यांचे पत्र येतास समर्थनाचा विचार करण्यात येणार आहे. पत्रपरिषद मध्ये देवेंद्र बागडे, प्रा.रमेश दुपारे, सुखदेवराव मेश्राम, नामदेवराव निकोसे, के.टी.कांबळे, राजु पांजरे, प्रविण आवळे, हंसराज उरकुळे, रामभाऊ वहाणे, सचिन नगरारे, दादाराव पाटील, प्रकाश कांबळे, मनोहर इंगोले, सुभाष बढेल, वैशाली तभाणे, संगीता चंद्रीकापूरे, सुनिता चांदेकर, जुलेखा बेगम, रुबिना खान, प्रेमलता जेकब, प्रकाश कांबळे उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles