“साहित्यातील राम ” अ.भा.साहित्य परिषद आयोजित पाडवा कार्यक्रम
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
पुणे.दि.9 (प्रतिनिधी) चैत्र शुध्द वर्ष प्रतिपदा, गुढी पाडवा निमित्ताने अ.भा.साहित्य परिषद, पुणे शाखेच्या वतीने “साहित्यातील राम ” या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात सुरुवातीला स्मिता इंगळगांवकर यांनी “कबिराचे विणतो शेले ” आणि गीता भुर्के यांनी “कल्याण करी रामराया…”ही प्रार्थनेच्या गायनाने झाली. “साहित्यातील राम” या विषयाचा धांडोळा घेताना डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी भारतातील विविध भाषांमधील रामायणांचा मागोवा घेताना 300हुन अधिक भाषांमध्ये रामायण लिहिलेली असून संपूर्ण जगात राम नामाचे गारुड आहे, असे सांगितलं. प्रा. श्याम भुर्के यांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेणारा “राम” ही संकल्पना विषद केली.
प्रा. चारुदत्त निमकर यांनी गीत रामायणातील काही प्रसंग सांगून राम चरित्रातील आदर्शाचे वर्णन केले. प्रा. अहमद शेख यांनी “मनामनातील राम “ही कविता सादर करून राम आणि भारतीय मानस यांचे अद्वैत उलगडत नेले.कार्यक्रमाची सांगता “रामका गुण गान गाये…” या गीताने झाली. श्री. मधुमिलिंद मेहेंदळे यांनी आभार म्हणाले.याप्रसंगी ॲड.अविनाश चाफेकर, बाबा ठाकूर, स्वप्नील जोशी, डाॅ.जोशी इ. मान्यवर, तसेच संस्थेचे पदाधिकारी व सदस्य आणि रामभक्त रसिक
उपस्थित होते.