शिल्पकार; सिंधू बनसोडे

शिल्पकार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बाबा तुम्ही संविधानाचे शिल्पकार
विचार पुष्टी कृतीत केली
जग उद्धारण्यासाठी….
ब्रह्मांड भेदून धर्मपालना केली

बाबा तुमच्या सामर्थ्यामुळे
अंधार अज्ञानाचा झाला दूर
दिली विचारांची निर्णय क्षमता
संकटास सुद्धा आलो समोर

तुम्ही कर्म पेरले आज ते उगवले
तुमच्या बोधीसत्वात विस्तारले
दीनदुबळ्यांच्या रक्षणासाठी…
क्रांतीचे शस्त्र हाती घेतले

मनामनात संवाद साधला
पंख कापून उडायला लावले.
आमची सावलीसुद्धा मोठी केली
मतलबी दुनियेत जगायला शिकवले

बाबा तुमच्या सुर्यरुपी तेजाने
अज्ञानी अधंकार खावून टाकला
अन्याय सहन करणार नाही…
अविचारी मनात विश्वास जागवला

बाबा तुम्हीच आमचे शिल्पकार
आमचे हित आणि प्रेम चिंतले
आज ताठ मानेने जगतोय…
तुम्ही होतात म्हणून परिवर्तन घडले

सिंधू बनसोडे
इंदापूर,पुणे
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles