शिवार
भीमा, तुझ्या जन्मामुळे
माळरानाचे झाले,शिवार,
पिकले,न्यायाचे पीक
संपला,अन्याय अत्याचार.
पिढ्यान पिढ्याचीं गुलामगिरी
वर्णव्यवस्थेनें,लादलेली,
भिमतेजापुढे टिकली नाही
तिची पाळेमुळे,मुळासगट उपटली.
शिक्षणापासून,होता दूर समाज
झाला,आज उच्च शिक्षित
डोळ्यात घातले, ज्ञानाचे अंजन
आज सारे,घर आहे आनंदात.
मान सन्मान, मिळाला
नोकरीं,चाकरी मिळाली,
आज,टोलेजंग बंगल्यापुढे
चारचाकी, उभी राहिली.
कसं विसरू?बां भीमा
तुझे उपकार कोटी कोटी,
मृतवत,जगण्याला जिवंत केलेस
उद्धारिलीस, कुळे कोटी कोटी.
कधी,तरसलो होतो
शिळ्या, तुकड्यासाठी,
आज पंच,पक्कवानाचे ताट
रोजचं आहे खाण्यासाठी.
माय बापाच्या, अगोदर
बां भीमा,नाव तुझेच घेईन
समाज उद्धराचें कार्य
नित्य नियमाने करेन.
मायादेवी गायकवाड
मानवत परभणी
==========