शिल्पकार
चौदा एप्रिल दीन भाग्याचा
उजळला घेऊन स्वप्नांना आकार
बंदीस्त आमच्या जिवनाचे
ठरले तुम्ही हो खरे शिल्पकार…
गुलामगिरीची तोडून बेडी
शिक्षणाची ज्योत पेटवली
आम्हा आंधळ्याची होऊन काठी
प्रकाशाची वाट दाखवली….
ओंजळीत आमच्या सदैव
ज्ञानाचे मोती भरले
लेखणीच्या टोकावर तुम्ही
माणुसकीचे धडे गिरवले
ममतेचा नव्हता शिरावर हात
रमाईची होती सदैव साथ
आमच्या सुखा साठी तुम्ही
लेकरं सारी गाडली मातीत….
धगधगत्या विचारांची
जगात पेटवली मशाल
मनुस्मृतीचे दहन करून
लेक तुझी बोले जयभीम खुशाल….
सारिका डी गेडाम, चंद्रपूर
========