ह.भ.प.श्री सद्गुरू उज्वलानंद महाराज पुण्यतिथी विशेष

ह.भ.प.श्री सद्गुरू उज्वलानंद महाराज पुण्यतिथी विशेष



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

दिनांक 16 एप्रिल 2024 ह.भ.प.श्री सद्गुरू उज्वलानंद महाराज , श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पुण्यतिथी दिवस. सद्गुरू उज्वलानंद महाराज हे महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेलेले एक आगळे वेगळे दैवत आहे. सद्गुरू उज्वलानंद महाराजांचे व्यक्तिमत्व कितीही समजून घेतले, तरी एका अंगातून त्याची मांडणी करताच येत नाही. कारण महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक आयाम आहेत. आस्तिक असो अथवा नास्तिक, परंतु तुकोबांचा विचार मानत नाही असा मनुष्य किमान ह्या महाराष्ट्राच्या मातीत तरी सापडणे अशक्यच. आपल्या रोखठोक शैलीत सत्य मांडण्याची हातोटी गवसलेले महाराज हे सर्व संतांच्या मेळ्यात शीर्षस्थानी असण्याचेही कारण हेच आहे. सदगुरु उज्वलानंद महाराजांमुळे श्री क्षेत्र अचलबेट देवस्थानची ओळख महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशात आहे.

सद्गुरू उज्वलानंद महाराजांचे नाव उच्चारले तरी, डोळ्यासमोर शांत, सात्विक व्यक्तीमत्व उभे राहते. कलियुगात वेदांचा (यज्ञ कर्मांचा) मार्ग लोप पावल्याने मनुष्याच्या उद्धारासाठी संतांनी भक्तीचा मार्ग विस्तृत बनवला. महाराजांनी त्यांच्या अख्ख्या जीवनात सर्वाधिक पुरस्कार भक्तीमार्गाचाच केले आम्हाला बऱ्याच अज्ञानी लोकांना भक्ती मार्ग दाखवून दिले. महाराजांना देव, धर्म मान्य आहे. परंतु त्याचे ढोंग अजिबात मान्य नव्हते. मनुष्याच्या जातीपेक्षा त्यांना त्याची भक्ती अधिक मोलाची वाटते.

आमच्या आयुष्यात महाराज आले, त्यांच्याशी नाते जुळले. सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली. जीवनाचे सार्थक झाले. कितीतरी चांगले निस्वार्थपणे काम करणारे सेवकरी मिळाले. आध्यात्म काय असतं श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पासून चाळीस किलोमीटर माहीत नव्हतं. महाराजांमुळे थोडे थोडे समजू लागले मन श्री राम जय राम जय जय राम नामात रंगू लागले जीवनाचा प्रवास आनंदात आणि सुखात सुरू झाला. आपल्या पाठीशी व सोबत उभे कोण आहेत हे प्रत्यक्ष दिसू लागले. आता जीवनाचे एकच लक्ष्य, महाराजांच्या सेवेत राहणे.

मी जे जे करतो, ते ते भगवंताकरिता करतो, असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते. भक्ताचे लक्षण म्हणजे भगवंत प्राप्तीशिवाय दुसरे काही नको असे वाटणे. भगवंतापासून आपल्याला जे दूर सारते ते खरे संकट होय. तोच काळ सुखात, भगवत्स्मरणात जातो. खरोखर, स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे. भगवंताचे स्मरण करणे म्हणजे हवन करणे होय, आणि अभिमान नष्ट करणे म्हणजे पूर्णाहुती देणेच होय. वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे. आपल्याला ज्याची आवड असते त्याचे स्मरण आपोआप राहते. जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते. पैशाला महत्व देणारा भरकटतो तर देवाला प्राधान्य देणारा सावरतो. विषय अंगभूत झाले असल्याने त्यांचे स्मरण सहज राहते; पण भगवंताचे स्मरण आपण मुद्दाम करायला पाहिजे. हे करणे अगदीच सोपे नाही; परंतु ते फार कठीण देखील नाही. ते मनुष्याला करता येण्यासारखे आहे.

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
गुरुजी भारत विद्यालय जि.धाराशिव

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles