लोपला ज्ञानसूर्य
जरी लोपला ज्ञानसूर्य
तरी प्रकाशमान दिशा..
समूळ नष्ट झालीय
कित्येक पिढ्यांची दशा..
आम्हांसाठी परिवर्तनाचे
वाजविले तुम्ही चौघडे..
मनूवादात खोल फसलेली
खुले केली ज्ञानाची कवाडे..
तुमची निर्भीड कलम
आणि मिटणारी शाई..
स्वातंत्र्य,समता,बंधूतेचा
संदेश रूजवत जाई..
रूढी परंपरांचे तण
मुळापासून उपटविले..
दीन दलित जनांसाठी
चवदार तळे खुले केले..
अज्ञानात पिचलेल्यांना
कळले ज्ञानाचे महत्व..
पुस्तकांच्या संगतीने
रचले उत्तुंग कर्तृत्व..
प्रज्ञा, शिल, करूणेचा
केलात तुम्ही अंगीकार..
भारतीय संविधानाचे
बनलात तुम्ही शिल्पकार..
दीन दलित वंचितांसाठी
केलात देहाचे चंदन..
ठरलात खरे महामानव
कोटी कोटी वंदन…
सविता पाटील ठाकरे
सिलवासा,दादरा नगर हवेली