मतदाता ‘मी’

मतदाता ‘मी’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

राजकारणाचा नको विचार
रंगबदलती दुनिया ही सुंदर!
स्वार्थापोटी जगतात बरोबर
निस्वार्थी नाहीच मिळणार!

वेगळा आहे रे एकटा जरूर
मतदाता ‘मी’ खराच हुशार!
ओळखतो मनातलं खरोखर
नाही वागत मी बेजबाबदार!

मतदानाचा अमूल्य अधिकार
जागरूकता बाळगा जरूर!
योग्य निवडावा नेता दर्जेदार
करील जनतेची सेवा भरपूर!

जर चुकला तुमचा निर्णय तर
नेता बसतो कधी मानगुटीवर
मतदाता बना रे चौकसखोर
ओळखा बरं पारखी नजर!

निसंकोच भरोसा कर्तव्यावर
बजावतो मतदान अधिकार!
चुकीला असेल रे प्रतिकार
मतदानाला नक्की जाणार!

मतदाता ‘मी’ हटके मजेदार
घेतो योग्यच निर्णय वेळेवर!
नेत्यांची नेतेगिरी असे बेकार
सतत नजर असते संपत्तीवर!

पाच वर्षे बसतात डोक्यावर
नाही म्हणायचा ना अधिकार
मतदाता ‘मी’ नाही गुन्हेगार
वागतात जसे मी एक चोर!

जगाच्या पाठीवर श्रेष्ठ थोर
मतदाता ‘मी’ असे जादूगार!

अशोक महादेव मोहिते
बार्शी,जिल्हा सोलापूर
============

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles