सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील रचना

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट बारा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*📘स्पर्धेचा विषय : सोक्षमोक्ष📘*
*🔸सोमवार : २२ / एप्रिल/२०२४*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*सोक्षमोक्ष*

खुलले गोड गुपित
लागला सोक्षमोक्ष
मी तुझ्या ह्रदय कुपीत…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🌸🍁➿➿➿➿
*सोक्षमोक्ष*

खूप झाली भांडणं
कठीण दोघांचं पटणं
घटस्फ़ोट हाच सोक्षमोक्ष

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर, जि.अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🌸🍁➿➿➿➿
*सोक्षमोक्ष*

सोक्षमोक्ष करावा लागतो
समोरासमोर येऊन
घेऊ नये मनाला लावून

*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🌸🍁➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*सोक्षमोक्ष*

कुटुंबातील कलाहाचा
सोक्षमोक्ष वेळेवर लावावा
नाहीतर झरा वाहील क्लेशाचा…

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा – पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🌸🍁➿➿➿➿
*सोक्षमोक्ष*

तुझं अन् माझं राहू दे
सोक्षमोक्ष होऊन जाऊदे
नको जीव टांगणीला

*साजेश मगरे ताडकळस*
*ता.पूर्णा,जि.परभणी*
*©सदस्य ,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🌸🍁➿➿➿➿
*सोक्षमोक्ष*

सखे आपल्या प्रेमाचा सोक्षमोक्ष
एकदाचा लावशील तू कधी..
ताटकळत निघून गेली सदी.

*सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दादरा नगर हवेली.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🍁🌸🍁➿➿➿➿
*सोक्षमोक्ष*

*मनात नसावी कुठली खंत*
*सोक्षमोक्ष करावा मिळून संथ*
*नाहीतर नात्याचा होतील अंत*

*विकास गोपाळ खराते*
*किल्लारी,जि.लातूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🍁🌸🍁➿➿➿➿
*सोक्षमोक्ष*

सोक्षमोक्ष लावून एकदाचा
मिटवावे सारे अंतर
पार कराया संसार भावसागर

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🌸🍁➿➿➿➿
*सोक्षमोक्ष*

ठरवलं लावायचा सोक्षमोक्ष
एकदाच अंतर्गत कलहाचा
चटका दुरगामी परिणामाचा

*सविता धमगाये,नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🌸🍁➿➿➿➿
*सोक्षमोक्ष*

न ठेवावं भिजत घोंगडं
वेळीच लावावा सोक्षमोक्ष
अन्यथा वाढत जातं त्रान्गडं

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🌸🍁➿➿➿➿
*सोक्षमोक्ष*

वसुंधरा दिन आज
प्रदुषणाचा लावू सोक्षमोक्ष
संकटातून वसुंधरेला मिळेल मोक्ष

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🌸🍁➿➿➿➿
*सोक्षमोक्ष*

शब्दाने शब्द लागतो
बोलण्याचा अर्थ निघतो
मन विटलं की सोक्षमोक्ष लागतो

*सौ. सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🌸🍁➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles