उद्योगधंदा
का बसला रिकामटेकडा
कर काही उद्योगधंदा
स्वयंस्फुर्तीने जग जीवन
कळेल तुला यशाचा फंडा
पदव्या घेतल्या तू अनेक
नौकरी मिळणे हेच ध्येय
प्रत्येकाला कशी मिळणार
कामधंद्यातून मिळव श्रेय
यौवनाचा काळ पूर्ण
जाईल असाच निघून
कर उपयोग चैतन्याचा
हाती आहे कसब अजून
ज्ञान आणि कृती यांची
सांगड योग्य गड्या घाल
उद्योगधंद्यात गुंतव स्वतःला
आदर्शाची तू बन मिसाल
सुलोचना लडवे
जि.अमरावती
===========