मायी अडाणी माय
मायी अडाणी माय
तिच्या उरात वात्सल्य
सांडूनी वाहे
कयीक करा प्राशन
मायी अडाणी माय
माह्या मायेची महती
कितीक गावों मी
तरी पुरूनी उरावी
वात्सल्याची खदान
मायी अडाणी माय
बाप नव्हता पाठीशी
लढली एकटी जगाशी
रात्रं-दिसं राबुनी
भूक भागवली लेकराची
मायी अडाणी माय
शाळेत धाडली
शिकवली घडवली
संस्काराचे बीज
रुजवली मनात
मायी अडाणी माय
थकली ती शरीराने
पण आजही उभी ताठर
लेक जगवा लेक शिकवा
घरोघरी करते प्रचार
मायी अडाणी माय
वात्सल्याचा झरा
जराही ना आटला
दिवसा गणिक पान्हा
फुटतो त्या प्रेमाला
मायी अडाणी माय
ज्योती सुधीर कार्लेवार
ता.जि.चंद्रपूर