असेही घडू शकते ?

असेही घडू शकते ?



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

महासत्ता बनण्याचे
स्वप्नं का दाखविता ?
देवाधर्माच्या नावाने
लोकांनाच नाचविता

३३ कोटी देवांनीही
दिले नाही कधी दर्शन
संकटे आली तरीही
फिरले ना चक्र सुदर्शन

कोरोनातून माणसाने
घेतलाच नाही का बोध ?
जातीच्या नि धर्मांच्या
भांडणात वाढतोय क्रोध

आंधळा दळतो नि कुत्रा
खातो दिवसाढवळ्या पीठ
अतार्किक माणूस भित्रा
द्वेषानं दुधात घालतो मीठ

सोडून सारे ते वादविवाद
धर्मांधता कधी संपेल का ?
जोडू हृदय करून सुसंवाद
मानवता धर्म दिसेल का ?

देशात असेही घडू शकते ?
विश्वास तरी मनात जागवू
प्रकाशवाट रे प्रेरक असते
भारतीय लोकशाही वाचवू

संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles