तिची एक नजर
तुझी एक नजर
गुलमोहर गुलमोहर
घायाळ मनाला
घाली अलवार फुंकर
विरहाच्या झळा
तडपवी तरसवी
आठवणी वेड्या
हासवी रडवी
हा दुरावा साजणी उन्हासारखा
कुठे थारा मिळेना मनासारखा
बंद पापण्यात येई स्वप्नांना बहर
आठवणी तुझ्या करती कहर
तू उन्हात मोहरते
मी मनात बहरतो
होता नजरेस नजर
मी तुझ्यात हरवतो
कोवळ्या मनावर
किती झाला असर
तुझी एक नजर
गुलमोहर गुलमोहर
अर्चना राजू ईंकने
लाखांदूर,जि.भंडारा
===========