सुखाच्या वाटा
जीवन हे सुंदर आहे,
जगण्याचा आनंद मोठा
धावू नको तू पैशांमागे
शोधीत सुखाच्या वाटा!
झोपडीतही झोप लागते
नसे उद्याची भ्रांत,
चटणी-भाकर गोड लागते,
मनास निवांतात!
रुजव तू मनी आपुल्या
मन:शांतीच्या लाटा,
धावू नको तू पैशांमागे
शोधीत सुखाच्या वाटा!
पैसा असूनी सुख नसते
धावाधाव जीवाची,
अहंकाराची मस्ती चढते
हेळसांड आरोग्याची!
जीवनाचे मर्म जाण तू
पैशाचा आनंद खोटा,
धावू नको तू पैशांमागे
शोधीत सुखाचा वाटा!
सुख असते मानण्यांत,
गरजूंच्या सहकार्यात,
संकटांना पेलण्यांत,
लहानांबरोबर खेळण्यांत,
सुख अंतरीच्या गर्भात,
नाही आनंदाला तोटा,
धावू नको तू पैशांमागे,
शोधीत सुखाच्या वाटा!
शारदा राहुल शिंदे
वाई, सातारा
==========