गुलमोहर

गुलमोहर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जन्मजात बहरण्याचे
दान तुझ्या रे झोळीत
म्हणून तर तू फुलतोस
तप्त ग्रीष्माचा झळीत… //

सारी सृष्टी होरपळताना
तुझा सहवास मंतरलेला
तू येथे लाल केशरी सडा
पथिकासाठी अंथरलेला.. //

इवला इवलासा पर्णसाज
असे वर्षाऋतूत हिरवागार
डोळ्याचे पारणे फेडणारा
ग्रीष्मकाळी लालगर्द शृंगार.. //

हमरस्त्यावर दोहो बाजूस
तू बांधलेस केशरी तोरण
कळत नाही या निसर्गाचे
कसे असावे अद्भूत धोरण… //

तू असा बहुगुणी गुलमोहर
या तनामनाला सुखावतोस
परिस्थितीवर मात करताना
हसत जगायला शिकवतोस… //

असह्य वेदनांचा आगडोंब
तू कसा लपवतोस देहात
आंम्ही माणसे मात्र हरतो
या दुःखासोबतच्या तहात… //

विष्णू संकपाळ
बजाजनगर औरंगाबाद
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles