जिवंतपणीच क्रूर कथा…ऐकणार का कुणी थडग्याची व्यथा…..?; वैशाली अंड्रस्कर

जिवंतपणीच क्रूर कथा…ऐकणार का कुणी थडग्याची व्यथा…..?; वैशाली अंड्रस्कर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण

तलवार त, थडगे थ, दौत द… लहानपणी मराठी वर्णमाला शिकताना गिरवलेले हे ‘थडगे’ मोठेपणी प्रश्नांची अनेक आवर्तने उठवणारे असेल असे वाटले नव्हते. मृत व्यक्तीला जमिनीत पुरल्यानंतर त्यावर सन्मानाने उभारलेली ती एक छोटीशी पेटीवजा वास्तू म्हणजे थडगे असे चित्रातील आकारावरून मात्र कळाले होते.

या सृष्टीत उदय आणि लय ठरलेलेच… सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळी मावळणारच… पुन्हा नव्याने उगवण्यासाठी….आयुष्याचे ही तसेच माणूस जन्माला आला की मृत्यू येणारच…पण या जन्म आणि मृत्यूच्या अवकाशात जगणे सुंदर करणे हे आपल्याच हाती…मग आपले असो की इतरांचे.
सुंदर जगण्यानंतरचा खरा प्रवास पंचमहाभूतांमधून कुणी अग्नीच्या स्वाहा…तर कुणी मातीच्या कुशीत…मग आठवण म्हणून कुठे समाधी, कुठे थडगे तर कुठे मजार… प्रत्येकाच्या श्रद्धास्थानानुसार वेगवेगळे नामाभिधान…हेतू मात्र तोच सोडून गेलेल्या माणसाची आठवण.

मग ही आठवण.‌..हे स्मरण मेल्यानंतरच का…? जिवंतपणी दुरावा आणि मेल्यानंतर आसवांच्या धारा…तळणा पुरणाचे जेवण… झगमगत्या चादरी आणि सुगंधी फुलांच्या माळा… यासाठीच का केला अट्टाहास जगण्याचा….? दोन सुखाचे घास… आपल्या माणसांच्या आपुलकीचे चार शब्द आणि दुःखावर मायेची फुंकर एवढेही जर आपण करू शकत नसू तर थडगे व्यथा मांडणारच ना…?

पण ऐकतो कोण थडग्याची व्यथा…कारण जिवंतपणीच होतेय इथे वास्तवाऐवजी कथा… अतिशय गहन गंभीर विषय ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेसाठी मुख्य प्रशासक माननीय राहुलदादा पाटील यांनी मराठीचे शिलेदार समूहात दिलेला… विचारशील, चिंतनशील आणि माणूस म्हणून जगताना प्रश्नांची आवर्तने निर्माण करणारा. तितक्याच तोलामोलाची शिलेदारांची लेखणी…थडग्यातील मनाला शब्दांतून मांडताना लेखण्यांना धार चढली. माणुसकी हरवलेल्या मानवी समुदायाला जाब विचारला…थडगेही जरा निवांत झाले असावे…चला कुणीतरी आपल्या दुःखाला वाचा फोडली…. खूप खूप अभिनंदन सर्वांचे…. आणि भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा…!

सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles