जि.प. व.प्रा.शा. दिनकरनगर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात; शिष्यवृत्ती धारक विद्यार्थांचा सत्कार
दिनकरनगर शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
अर्जुनी मोर (जि.प्र.) : जिल्हा परीषद वरिष्ठ प्रा.शा. दिनकरनगर ता. अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया येथे आज (ता. १) महाराष्ट्र राज्य स्थापना दिन व जागतिक श्रमिक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ६४ व्या महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनी मा. असित मंडल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच वार्षिक निकाल घोषित करून विद्यार्थ्यांना निकालपत्रक वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. शिष्यवृत्ती परीक्षेत दिनकरनगर प्रा. शा. मधील कु.निमिषा करण सिकदार (५वी) आणि सुजल विश्वजित मंडल (५वी) दोघे उत्तीर्ण झाले.
यावेळी सरपंच कु.सुचित्रा विनय शील, अध्यक्ष असितजी मंडल, श्री. सुबोधजी मजुमदार (उपसरपंच), सचिन घारामी, रिंकू पवित्र सरकार, ललिता धीरेन मंडल, बनमालीजी मंडल (पो. पाटील), एस.मंडल सर, गेडाम सर, सिकदार सर, मंडल सर, इतर शिक्षक व ग्रामस्थांनी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.