‘महाराष्ट्रात ‘मराठी बाणा’ जिवंत आहे का?’; सविता पाटील ठाकरे

‘महाराष्ट्रात ‘मराठी बाणा’ जिवंत आहे का?’; सविता पाटील ठाकरे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण

राकट देशा ! कणखर देशा !दगडांच्या देशा !!
नाजूक देशा ! कोमल देशा !फुलांच्याही देशा !!
प्रमाण घ्यावा ! माझा हा श्री !महाराष्ट्र देशा !!

महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास सांगणारे हे गीत कानी पडत असताना, महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आल्याचा मनापासून अभिमान वाटला. या पार्श्वभूमीवर रविवारी माझ्या मुलीला अंकिताला घेण्यासाठी मुंबईला जाण्याचा योग आला. शेवटी मुंबईचं ती…मायानगरी, महाराष्ट्राची राजधानी, सारं काही मिळतं तिथे.. आम्ही मरीन लाईन्स,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स कुलाबा…बरेच फिरलो खरेदीही केली. खूप काही घेतले, पण मला एक गोष्ट शोधूनही मिळत नव्हती. खूप खूप शोधले… अगदी सर्वत्र, कानाकोपऱ्यात, शेवटी नाहीच मला मिळाले.

काय बरं मी शोधत होते? करा कल्पना, लावा अंदाज… नाही ना येत अंदाज..?? मराठी सारस्वत मंडळी मी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत “मराठीबाणा” शोधत होती. सर्वत्र अगदी ज्या हुतात्मा चौकानं संयुक्त महाराष्ट्र घडवला, तिथेही मला नाही सापडलं मराठीपण…! ‘महाराष्ट्रात ‘मराठी बाणा’ जिवंत आहे का? असाही प्रश्न मला पडला. जरा इतिहासात मी गेले.संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या त्या १०५ हुतात्म्यांचा आवाज मात्र मला नक्कीच ऐकायला मिळाला…!

उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा..
जयजयकार तयांचा आसमंती गर्जावा….
सांडली रुधिर ज्यांनी महाराष्ट्रासाठी….
जन्म तयांचा फिरूनी महाराष्ट्र देशीच या व्हावा..

पण, या हुतात्म्यांनी महाराष्ट्रात जन्म घ्यावा अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे का आज ??? अरे ज्यांच्या शब्दावर अख्खी मुंबई श्वास घ्यायलाही थांबायची, त्या बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा ज्या फोर्ट विभागात आहे, तिथेही मला नाही दिसलं मराठीपण. काय वाटत असेल बाळासाहेबांना? तेही थोडे विवश वाटलेत. मुंबईसह मराठी भाषिकांचे संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे म्हणून, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना १९५६ मध्ये केली गेली.आचार्य अत्रे, एसएम जोशी, के.सी ठाकरे, सेनापती बापट, नाना पाटील, भाऊसाहेब हिरे यांच्या अखंड प्रयत्नांनी व एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानांनी हा महाराष्ट्र घडलाय,पण आज आपण हे सारं विसरून स्वार्थी राजकारणातही महाराष्ट्राचा बळी देत आहोत.

मुघलांना ‘सळो की पळो’ करून सोडणाऱ्या शिवछत्रपतींची ही भूमी आहे, भारताला संविधान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ही भूमी आहे. स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या ज्योतिरावांची ही भूमी आहे. दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा, कधीच कुणापुढेही न झुकणाऱ्या शूरवीरांची ही भूमी आहे. पण आज… अनेक बाबतीत आपली दुर्दशा झाली आहे. १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जरा आत्मचिंतन करूया, मुकुंदराजांचा विवेक सिंधू या आद्यग्रंथापासून सुरू झालेला हा महाराष्ट्राचा साहित्यप्रवास आधुनिक अनेकाविध रंगीबेरंगी साहित्यांपर्यंत पोहचलेला आहे.केवळ साहित्यच नव्हे, कला, क्रीडा, संस्कृती यातही महाराष्ट्र नेहमी अव्वलच राहीला आहे. हे अव्वल स्थान टिकविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

आज १ मे ‘महाराष्ट्र दिना’चे निमित्त साधत ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘महाराष्ट्र माझा’ हा विषय दिला. अनेक कवी कवयित्रींनी आपापल्या परीने या महाराष्ट्राची थोरवी आपल्या लेखणीत एकवटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन. पुनश्च तुम्हा सर्वांस पुढील लिखाणासाठी अनंत कोटी शुभेच्छा.. जय महाराष्ट्र…!

सौ. सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles