बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सात🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : महाराष्ट्र माझा🥀*
*🍂बुधवार : ०१/ मे /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*महाराष्ट्र माझा*

कडक पहारा सह्यगिरीचा
कणखर बाणा या मातीचा
शिवरायांच्या पराक्रमाचा
वारसा इथे नित शौर्याचा
गाजे जयघोष, महाराष्ट्र माझा

अभंगासह नाद ओवीचा
पोवाडा ही पराक्रमाचा
अभिमान असे लढवय्यांचा
प्रणेता हा हरित क्रांतीचा
गाजे जयघोष, महाराष्ट्र माझा

जमे मेळा वारकऱ्यांचा
संदेश मिळे समानतेचा
आदर्श सदा नीतिमूल्यांचा
शिवरायांच्या पराक्रमाचा
गाजे जयघोष, महाराष्ट्र माझा

लावणीच्या लावण्याचा
कीर्तन रंगी रंगण्याचा
वनराईच्या हिरवाईचा
सागराच्या गहिराईचा
गाजे जयघोष, महाराष्ट्र माझा

संतजनांच्या पावनतेचा
वारसा इथे साहित्याचा
क्रांतीच्या तेजज्योतीचा
संस्कृती नी शिक्षणाचा
गाजे जयघोष, महाराष्ट्र माझा

कृषीवलांच्या श्रमघामाचा
श्रमिकांच्या हो कौशल्याचा
पिकल्या माणिक मौक्तिकांचा
अपार साठा इथे ऊर्जेचा
गाजे जयघोष, महाराष्ट्र माझा

मानबिंदू हा सुधारणांचा
औद्योगिक या प्रगतीचा
कृषीक्षेत्रातील श्रमगाथेचा
अभिमानची विकासाचा
गाजे जयघोष महाराष्ट्र माझा

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩📘🚩➿➿➿➿
*महाराष्ट्र माझा*

शेतकऱ्यांचा कामगारांचा
साधुसंताचा महाराष्ट्र माझा
छत्रपती शिवाजी संभाजीचा
मर्द मर्दानीचा महाराष्ट्र माझा…

शाहिरांचा लेखक कवींचा
समाजप्रबोधनकांराचा महाराष्ट्र
नटली भूमी साहित्यिक कलांनी
प्रगतीपथावर आहे महाराष्ट्र…

धन धान्याने उद्योगाने
महाराष्ट्र राज्य समृद्ध
साक्षर आहे खेडी शहरे
शिक्षणाने मागास नाही निर्बुद्ध….

मराठमोळे संस्कृतीचे दर्शन
घडवी जोपासुनी परंपरा
रुढीवाद अंधश्रध्दा लोपवली
भेदभावाला इथे नाही थारा…

हिरवे डोंगर जलमय नदी
पिण्यास मुबलक पाणीसाठा
वनराई वसुंधरा रम्य मनोहर
सोन्या नाण्यांनी रग्गड पेठा…

*प.सु. किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩📘🚩➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*महाराष्ट्र माझा*

भारत माझा आहे सर्व संपन्न देश
महाराष्ट्रातील लोकांचा विभन्न वेश….

महाराष्ट्र राज्य माझे राज्यात महान
सदैव गाऊ आपण याचे गुणगान….

पावनभूमी आहे ही संतमाऊलींची
रेलचेल आहे इथे सण अन उत्सवांची..

आनंदी जोशी पहिली डाॅक्टर महिला
मुलींना शिक्षणद्वार खुले केले वंदन सावित्रीला….

सांस्कृतीक वारसा महाराष्ट्राला लाभलाय
अजूनही मानवी संस्कृतीने तो जपलाय…

छत्रपती शिवजी महाराज इथे जन्मले
हिंदवी स्वराज्य शिवबाने स्थापन केले..

म.गांधी,लो.टिळक,आगरकर याच मातीतले
स्वातंत्र्यासाठी यांनी अतोनात हाल सोसले…

कल्पना,कृष्णा भिडल्या उंच गगनी
स्वतःचे नाव कोरले सर्वांच्याच मनी….

भीमा,कृष्णा,गोदावरी नद्या आहेत पावन
सृष्टीचे सौंदर्य खुलवतो ॠतू सावन…

महाराष्ट्राची राजधानी मुंबई नगरी
निसर्गाचे देखणं कोंदण आहे सह्यगिरी…

महाराष्ट्रात सर्वांचीच आहे परंपरेत एकजूटy
नाही होणार मानवी परंपरेची कधीच ताटातूट….

*वसुधा वैभव नाईक,पुणे*
*धनकवडी, जिल्हा – पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩📘🚩➿➿➿➿
*महाराष्ट्र माझा*

जिजाऊचे असे जिथे मातृत्व
शिवबाचे वसे धुरंधर नेतृत्व
संतांच्या ठाई वैराग्याचा नूर
ओसंडे येथे हृदयाहृदयातून
ज्ञानोबा तुकोबा भक्तीचा महापूर
इथेच उदयला वाघ वारणेचा
इथेच दीप पेटला क्रांतीज्योतीचा
शौर्यशील नर रत्नांची इथेच खाण
फुलवी तटे गोदामाईचे जलपान
बळी उगवितो हरितक्रांतीचे वाण
लेण्या उंचाविती जगात सन्मान
सर्वधर्मसमभाव असा महाराष्ट्र माझा
ज्याचा मला सार्थ सार्थ अभिमान…

*तारका रुखमोडे*
*अर्जुनी मोर गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩📘🚩➿➿➿➿
*महाराष्ट्र माझा*

ऐका यशोगाथा महाराष्ट्राची
नाविन्याने नटलेली मराठी
सण संस्कृतीचे माहेरघर
उत्सवानिमित्त समजण्या साठी

शब्दात वर्णावे इतिहासाचे धडे
गाथा पराक्रमाची वैज्ञानिकांची
भूमी संतांची साहित्यिकांची
शूरवीरांची कामगारांची शाहिरांची

समाज सुधारकांची ही भूमी
संत ज्ञानेश्वर ,तुकाराम, रामदास
स्वामीमहाराज, पावन भूमी
यात मराठी अस्मितेचा वास

सह्याद्रीच्या पर्वतरांगा गड कोट
शिवाजींचे मावळे याच भूमीतील
ओव्या भारुडे शाहिरी गायली
महाराष्ट्रातील साहित्यिकातील

सावित्री जिजाऊ वीर माता
वर्णावी किती महाराष्ट्राची महती
अभिमान मला या जन्मभूमीचा
आवडीने महाराष्ट्र गीत गाती

जय जय महाराष्ट्र माझा देशा
सदैव वंदन आमचे तुजला
वैभवशाली महाराष्ट्राची गाथा
सतत नाविन्याने नटलेला

महाराष्ट्र दिन आज गौरवाचा
शूरवीरांचा क्रांतिकारकांचा
कामगार दिनाचा कष्टकऱ्यांचा
महाराष्ट्र माझा आहे अभिमानाचा

*सौ.कुसुम पाटील*
*कसबा बावडा कोल्हापूर*
*©️सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩📘🚩➿➿➿➿
*महाराष्ट्र माझा*

थोरवी महाराष्ट्राची किती थोर
विविधतेने नटलेलं राज्य सुंदर

उंच उंच कडे, दरी हे डोंगर
सह्याद्रीचा छावा कड्यावर!

हिरवी शाल पांघरली सुंदर
वसुंधरेचा शालू हिरवागार!

किती जाती धर्म सभोवार
एकत्र साजरे करी सणवार!

समता,बंधुता सुखी परिवार
बांधून ठेवीली नात्यांची दोर!

सुख दुःखात सोबती बरोबर
फुटे हृदयातून प्रेमाला पाझर!

महाराष्ट्राची महिमा गावी थोर
धर्म जातीभेद गेले कोसो दूर!

महाराष्ट्र पसरला खूप सुंदर
ख्याती महाराष्ट्राची जगभर!

महाराष्ट्र माझा असे शूरवीर
इतिहास साक्षीला दमदार!

जगावे आनंदाने महाराष्ट्रभर
महाराष्ट्र मातीची महती थोर!

*अशोक महादेव मोहिते*
*बार्शी,जिल्हा सोलापुर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार *समूह*
➿➿➿➿🚩📘🚩➿➿➿➿
*महाराष्ट्र माझा*

महाराष्ट्र माझा
संतांची मातृभूमी
स्वदेशरक्षण करी
संरक्षण संपन्न भूमी ॥१॥

महाराष्ट्र देशरक्षक
सुसंस्कृत राष्ट्र
राष्ट्र उद्बोधक
सु सुराज्याचे राष्ट्र ॥२॥

ध्येयाची देशसेवा
अचाट अफाट शक्ती
आपुलकीची सेवा
देशाची ती भक्ती ॥३॥

महाराष्ट्र माझा
हल्ला सिमापार
करीतो महाराष्ट्र माझा
शत्रूला करी आरपार ॥४॥

देशरक्षणार्थ
जाई सिमेवरी
सीमा रक्षणा समर्थ
नसे मिन्नतवारी ॥५॥

महाराष्ट्र माता
ही शूरवीरांची
सुस्वर मधुर गाता
असे ती गुणवंतांची ॥६॥

महाराष्ट्राची शान
राष्ट्रध्वज माझा
राखतो नित्य सन्मान
तिरंग्याचा महाराष्ट्र माझा ॥७॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩📘🚩➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles