न्यू मून स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

न्यू मून स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अर्जुनी /मोरगाव : स्थानिक न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी झेंडावंदन कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य राकेश उंदीरवाडे ,प्रमुख पाहुणे म्हणून नितेश क्षीरसागर, तारका रुखमोडे,सुरज मोटघरे उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले . प्रचार्य राकेश उंदीरवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र गीत गायन करण्यात आले. व या शुभप्रसंगी वटवृक्ष व पिंपळ वृक्षाचे रोपण करण्यात आले. हरितक्रांती तथा वृक्षसंवर्धन याचा सुंदर संदेश यातून देण्यात आला.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नर्सरी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल घोषित करण्यात आला.सर्व पालकांच्या हाती गुणपत्रिका देण्यात आली. तसेच महाराष्ट्र व कामगार दिनाबद्दलची माहिती अध्यापिका शीला बोरीकर यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार अध्यापिका त्रिवेणी थेर यांनी केले .सर्व शालेय विद्यार्थी ,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles