“अस्मिता जपलेल्या अस्तित्वाची शर्यत आम्ही कधी जिंकणार?”; विष्णू संकपाळ

“अस्मिता जपलेल्या अस्तित्वाची शर्यत आम्ही कधी जिंकणार?”; विष्णू संकपाळ



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

*अस्तित्व राखू*
*जिंकू अथवा खपू*
*अस्मिता जपू*

“मराठीचे शिलेदार” समूहात शुक्रवारीय ‘हायकू’ काव्यस्पर्धेसाठी दिलेल्या चित्रात दिसणारे ‘आगरी’ समाजबांधव हे सुद्धा अशाच एका प्रतिकारासाठी उभे आहेत. ज्यांच्या अस्तित्व आणि अस्मितेचा प्रश्न चर्चेच्या ऐरणीवर गेले अनेक महिने सातत्याने खणखणतो आहे.’आगर’ म्हणजे भात पिकवणारे, किंवा मीठागारात काम करणारे ते आगरी. यांचे मूळ पार रामायण महाभारत कालखंडात सापडते. यांचे वंशज रावणाच्या दरबारात गायक वादक होतेच. तसेच राजा नहूश, यती, ययातीचा वंशज बलिभद्राचा पुत्र म्हणजे आगला. पुढे तेराव्या शतकात हेच आगले लोक पैठणच्या बींबराजाच्या सैन्यात होते आणि हेच बींबराजे चंपानेरचे राज्यकर्ते होते.. तद्नंतर नाशिक, घोटी, कल्याण प्रांतात काही कोरीव शिल्पे आढळतात ते शिल्पकार म्हणजेच आगरी पाथरवट होते. पुढे बींबराजाने कोकणात अलिबाग, आवास, सासवण ते माहिम पर्यंत कारभार पाहिला. पोर्तुगीजानंतर इंग्रजांनी सात बेटे एकत्र करून आताचे मुंबई शहर बनवले. मात्र याचा मूळ कर्ता, रचयिता महाराज प्रताप बींबराजा हाच होता. पुढे छत्रपती शिवरायांच्या आरमारातही याच आगरी जमातीने आघाडीवर रहात स्वराज्यासाठी रक्त सांडले.

मात्र स्वातंत्र्यानंतरच्या औद्योगिक क्रांतीत माहिम, चेंबूर भागातील दहाबारा गावे उठवली गेली. तेव्हा पासून ते आज नवी मुंबई येथे होवू घातलेल्या विमानतळाला याच समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, शेतकरी व कामगार नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध अस्मितेचा संघर्ष छेडला आहे. समुद्राच्या आसपास राहणार्‍या कोळी समाजाचे आज असेच प्रश्न “आ” वासून उभे आहेत. राजकीय इच्छाशक्ती यांच्या मागण्यांकडे कोणत्या दृष्टीने पाहते? आणि पुढे यांच्या समस्येचे समाधान कसे होते याचे उत्तर काळच देईल..! परंतु, आमच्या अस्तित्वाची शर्यत आम्ही कधी जिंकणार? या विवंचनेत आजही आगरी समाजबांधव अनुत्तरीत प्रश्नाचे उत्तर शोधत आहे.

*आगरी कोळी*
*भूमीपूत्रांची व्यथा*
*सुस्त व्यवस्था*

शुक्रवारीय हायकू स्पर्धेसाठी आदरणीय राहुल दादांनी हे चित्र देवून कमालीची समयसूचकता दाखवली. एक वास्तववादी ज्वलंत विषय ‘हायकू’च्या माध्यमातून आपले शिलेदार कसा ऐरणीवर आणतात ही उत्सुकता होती. त्या तुलनेत अनेकांनी छानच प्रयत्न केलेत. मात्र चित्राचा नेमका उलगडा न झाल्याने थोडे विषयांतर झाल्याचे जाणवते.. असो.. सर्वांच्या लेखणीला आभाळभर शुभेच्छा. आणि आज मला या विषयावर परिक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल समूह प्रमुख आ. राहुल दादांचे मनःपूर्वक आभार.

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles