जि. प.मोरगाव शाळेचे वरद प्रधान व तन्वी भिवगडेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

जि. प.मोरगाव शाळेचे वरद प्रधान व तन्वी भिवगडेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अर्जुनी मोर: जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगाव येथील इयत्ता पाचवी वर्गामध्ये शिकत असलेले वरद नरेश प्रधान व तन्वी विरेंद्र भिवगडे यांनी सन २०२३-२४ च्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश मिळवून वर्ग शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.

सदर दोन्ही विद्यार्थी अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे असून, शैक्षणिक क्षेत्रातल्या कौशल्याबरोबर सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा चमकदार कामगिरी करत असल्याचे मनोगत मुख्याध्यापिका रेखा गोंडाने यांनी व्यक्त केले. शाळेत नियमित सराव वर्ग व इंटरनेट सारख्या माध्यमातून अध्ययन-अध्यापन यामुळे गुणवत्ता सातत्याने टिकवून ठेवण्यासाठी मुख्याध्यापक सौ .रेखा विजय गोंडाणे यांचे नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली घोडदौड सुरू असल्याचे बोलले जात आहे.

शाळेचे पदवीधर शिक्षक सु .मो. भैसारे, विषयी शिक्षक पी. टी. गहाणे, व्ही. बी. भैसारे, जे. एन. ठवकर , रेवानंद उईके,वामन घरतकर ,अचला कापगते, रूपाली मेश्राम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी लोधी, सरपंच गीता ताई नेवारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रमेश लाडे आदींनी सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles