मळभ
मळ्भ दूर व्हावे
मनी रुतलेल्या नैराश्याचे
हृदयी अंकुर फुटावा
किरण पसरावे चैतन्याचे
कोणतीही गोष्ट मुळी
नसते अवघड ना अशक्य
प्रयलांची पराकाष्ठा करता
मनी इच्छिलेले होते साध्य
काळ्याकुट्ट अंधारात
दिशादर्शक ठरते इवलीशी पणती
तम करून दूर सारा
फुलवू जीवनज्योती
खरं तर आपणच असतो
आपल्या नशिबाचे शिल्पकार
प्रयत्नांची वल्ही मारता
यशाची नौका होते पार
मळभ दूर व्हावा सारा
कुविचारांचा, नैराश्याचा
मनी तेवत राहावा दिवा
सुविचारांचा, संस्काराचा
स्नेहल संजय काळे
फलटण,जि.सातारा
============
‘