काव्यप्रकाश
काव्यप्रकाश होऊ या
करून भावनांचे रोपण
बोध व्हावा सत्धर्माचा
भरून निघावे उणेपण
दीन,दलित,अपंगांचे
जीवनी व्हावा उजेड
असे काव्य फुलावे
विचार अन् कृती जोड
बोध व्हावा समानतेचा
बंधुभाव वाढावा शब्दातून
ज्ञानप्रकाश पडावा सदा
अज्ञानी पडद्यावर त्यातून
उजळावे स्त्रीयांचे जीवन
पर नारी भगीनी समान
कुविचारांवर व्हावे वार
असा वर्णावा काव्यसन्मान
काव्य असावे वैचारिक
दिशादर्शक समाजाचे
वहावा झरा माणुसकीचा
करून निर्दालन अत्याचाराचे
काव्य आणि कवी यांचे
नाते ऋणानुबंधाचे
प्रकाशमय व्हावे जीवन
ज्ञान विस्तारावे भाषेचे
ताल,सूर,लय बद्ध
काव्य असावे गुंफलेले
अंतर्मनाचा ठाव घेईल
अलंकारिक सजलेले
सुलोचना लडवे
अमरावती
==========