पुस्तक माझे सोबती
ज्ञान सखी पुस्तक माझे सोबती
छंद मला लाभला वाचनाचा
पुस्तकातून ज्ञानमिळे सर्वांगांनी
मोठेपणा मिळे मनाचा
चला करू मैत्री पुस्तकांशी
संग्रहित ज्ञान असते पुस्तकात
वाचन चिंतनाने मिळे समाधान
बुद्धी कौशल्य ज्ञानसागरात
जगण्याची कला शिकवते पुस्तक
अज्ञान अंधकार दूर करते
ज्ञानियाला ज्ञान देते पुस्तक
जीवनात सुख आनंद आणते
जगण्यास भरारी देते
ज्ञानातून मार्ग काढते
दिशाहीन झालेल्यांना
जीवनाची ध्येय गाटते
व्यक्तिमत्त्व कर्तुत्व फुलते
अज्ञानातून ज्ञानाकडे नेते
वेद गीता बायबल ज्ञानात
पुस्तक आत्मविश्वास देते
संकल्प करूया आज आपण
रोज एक तरी पुस्तक वाचूया
सुसंस्काराचा पाया रोवून
पिढीला ज्ञानाचा सागर देऊया
आज पुस्तक दिनी मैत्री करून
मोबाईलच्या या जीवनात
पुस्तकाचे महत्व पटवून देऊन
अज्ञानाला देऊ पुस्तक ज्ञानात
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
=============