भावनांचा गाव
ना जाणो किती काळ
केली तुझी आराधना
आज फळास आली
माझी कठोर साधना.. //
जेंव्हापासून कळला
सखे तुला माझा भाव
गजबजलाय मनात
भावभावनांचा गाव.. //
कळत नकळत सखे
हसतोय मी गालात
कसे सांगू कोणत्या
वावरतोय मी तालात.. //
खुलली तुझीही कळी
भासते अशी चुलबुली
बनूनी जणू तू मनचली
माजवलीस खलीबली… //
आता सरले सारे द्वैत
मिटले क्षणात अंतर
माझ्या तेच तुझ्या मनी
दिलेस याचे प्रत्यंतर… //
ठरवून कांहीच नव्हते
असावे हे विधिलिखित
दोघांच्याही मनी मानसी
ठाम झालेय अधोरेखित.. //
विष्णू संकपाळ बजाजनगर
जि.छ. संभाजीनगर
==============