समाजव्रत
देव मी पाहिला माणसात
समाजव्रत स्विकारणारा
तन-मन-धन कार्यासाठी अर्पूण
अपेक्षा न बाळगणारा
मानवसेवा हीच ईश्वरसेवा
कार्य करणाऱ्यांनी मानली
अन् सिंधुताई सपकाळ
अनाथांची माई बनली
कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटेंनी
आपले संपूर्ण आयुष्य वाहिले
या समाज कार्यासाठी आपले
विलासी जीवनही त्यागिले
माणुसकीचं नातं जपावं
माणुसकीचा धर्म पाळावा
देव मंदिरात नाही तर
देव माणसात पहावा
प्रांजली जोशी.
विरार, पालघर
=============