जाऊ द्या मला काय त्याचं; पैठणकर के.आर.

जाऊ द्या मला काय त्याचं



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जावे तिथे खावे, गरजवंतांना लुटावे
त्यास समाजसेवा आपले कर्तव्य मानावे
लाच,देईल घेईल भ्रष्ट्राचार करील
मोडील,नियम त्याचे सत्कार करावे
जाऊ द्या.मला काय त्याचं.तुम्ही आहे सुस्त
मी जरा बोललो की माझा तोंड दिसतं

नो पार्किंग जिथे फलक
तिथेच लावून गाडी वाहतुकीची कोंडी करावी
वेगावर नियंत्रण ठेवा,जिथे फलक
तिथे,बेशिस्तीने वाहने सुसाट दामटावी
जाऊ द्या.मला काय त्याच.तुम्ही आहे सुस्त
मी जरा बोललो की माझ तोंड दिसत

सोशल अंतराचा उडून बोजवारा
मास्क, सॅनिटायझरचा वापर टाळावा
स्वच्छता पाळा, रोगराई टाळा जिथे फलक
तिथेच भिंतीवर मारावी पिचकारी
जाऊ द्या.मला काय त्याच.तुम्ही आहे सुस्त
मी जरा बोललो की माझं तोंड दिसतं

जगलं तोडुन प्रदूषण वाढवा
निसर्गाचा ऱ्हास करून झोळी आपली भरावा
तोडून लचके वसुंधरेचे नद्या ही सडवा
धनी सृष्टीच्या नाशाचा म्हणुन मिरवा
जाऊद्या मला काय त्याच,तुम्ही आहे सुस्त
मी जरा बोललो की माझा तोंड दिसत

धर्माचे आखाडे,जातीजातीत भरावा
शांततेचा भंग करून दुही समाजात माजवा
भगवा निळा हिरवा पिवळा नेमका रंग ठरवा
न्याय,समता बंधुता एकात्मता पायदळी तुडवा
जाऊ द्या.मला काय त्याचं.तुम्ही आहे सुस्त
मी जरा बोललो की माझं तोंड दिसतं

लोकशाहीने दिले हक्क,गुर्मीत बोलावे
कर्तव्याची ऐसीतैसी सैराचारने वागावे
आपलेच अवगुण आपणचं वर्णावे किती
किती ओढवे काकर,उपरोधक लिहावे किती
जाऊ द्या मला काय त्याचं तुम्ही आहे सुस्त
मी जरा बोललो की माझं तोंड दिसतं

श्री पैठणकर.के.आर
मु.पो.नगरसुल.ता.येवला.जि.नाशिक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles