उसनवारी प्रेमाची
निस्वार्थ प्रेमास नसे
जगती तोड कशाची
परी कित्येक नात्यात
भासते उसनवारी प्रेमाची…..
प्रेम ,बंध, माया ममता
मानव जीवनास आधार
पैसा, धन,ऐश्वर्यसंपन्नता
नुसता व्यवहारी बाजार…..
दिव्यांची दीपमाळ जशी
अंधार छेदून प्रकाश देई
राग, द्वेष, मत्सर, सोडता
प्रेमानं जग जिंकता येई…..
क्षणभंगुर आयुष्य मानवा
मनसोक्त कर प्रेम उधळण
नको भौतिक सुखा मागे धावू
ओलावा जप तू मनोमन……
नकोत सभोवती नावाला
माणसाचा अमाप गराडा
जिव्हाळा ठेव अबाधीत
नको भावनांचा चुराडा…..
वैराने ने वाढे वैर तसेचं
जरी हे अनोखे तंत्र
प्रेमाने वाढे प्रेमचं
जाणं हा सुखी मंत्र….
वर्षा मोटे पंडित
छत्रपती संभाजीनगर