डोंगरमाथा
डोंगरमाथा घ्यावा चढूनी
हिरवा रान पहावा खरा
हिरव्या रानातूनी
बघावा खळखळणारा झरा
खळखळणाऱ्या झऱ्यासवे
हा मंजुळ गातो वारा
वाऱ्या संगे उडण्यासाठी
साद घाली पाखरा
डोंगरमाथ्या वरूनी जाई
नागमोडी ही वाट
वाटेवरूनी चालता मज
भासे निराळा थाट
डोंगरमाथ्यावरी पहिली
उंच झाडी अन वेली
वेलीवरती पुष्पफुलांचा
सुगंध दरवळ भारी
डोंगरमाथा चढुनी आलो
वाहे घामाच्या धारा
अनुभवली ही निसर्ग सृष्टी
आनंदाला नाही पारा
सुनंदा आर.किरसान
अर्जुनी मोर ,गोंदिया
=============