हृदयी वसंत फुलतांना; सचिन पाटील

हृदयी वसंत फुलताना



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शब्दातीत आनंदबहर
कलिका मनाची खुलताना
अतुल्य आविष्कार काव्याचा
हृदयी वसंत फुलताना

मानवी जन्म आनंदयात्रा
शब्दांची गुंफण सौख्यदात्री
लोभस क्षणी काव्यनिर्मिती
अनुभवतो आनंदयात्री ..२

शब्द शाईचे थेंब अनोखे
लेखणीतून पाझरतात
अंतरीच्या कागदाभोवती
काव्यनक्षी फेर धरतात ..३

हृदयी वसंत फुलवत
जणू झंकारतो काव्यनाद
स्वतःचाच परिचय होण्या
साधू थोडा निवांत संवाद ..४

आत्मज्योत होई प्रज्वलीत
तम अवघा दूर सारता
आनंदयात्री ठरु आपण
सकारात्कता स्विकारता ..५

काव्यरूपी नवनिर्मितीने
गूढ अंतरीचे उकलावे
आनंदमय होण्या जीवन
वसंताचे आगमन व्हावे ..६

सचिन शंकर पाटील
अलिबाग, रायगड
=

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles