बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : नरकयातना🥀*
*🍂बुधवार : ०८ / मे /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*नरकयातना*

स्वर्ग, नरक, पाप,पुण्य
कल्पनाविश्वात भावना..
वाईट वर्तन पाबंदसाठी
ती भीती घातलेली मना…

सद्वर्तन घडावे यासाठी
सत्कर्माची घालून जोड..
नेक काम करीत रहावं
नसे त्यास कसली तोड…

दुष्ट प्रवृत्ती कमी होईल
नरकयातना सांगल्याने..
स्वर्गात जाया धजतील
वागून सदाचारी वृत्तीने…

पाहिला का स्वर्ग कुणी
प्रत्यक्ष जावून स्वर्गात..
स्वर्गात गेलेला पुन्हा तो
दिसलाय का या जगात…

काल्पनिक नर्क मानला
तरी भीती किती वाटते..
जरी स्मरण नरकयातना
सत्कार्याला मन लागते…

आपल्याचं कर्माचे फळ
जिवंतपणी मिळतं सारं..
नरकयातना काय माहीत
हिशोब हा आपल्या म्होरं…

*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️♠️🗯️♠️♾️♾️♾️♾️
*नरकयातना*

नको करू दुष्कर्म मानवा
भोगशील नरकयातना
सत्कर्माने जगणे सुकर
सुख स्वर्गीचे जीवना

कुविचार मनातील रे
घालतात पिंगा भोवती
कर त्यांना परास्त तू
आत्मबल जागव नीती

मानवतेचा हो पाईक
हो भला समाजासाठी
ऋणानुबंध जुळतील रे
पडती आपुलकीच्या गाठी

जैसे कर्म तैसे फळ मिळे
जाण गीतेचे तत्वज्ञान
सत्कर्माचे फळ गोड
जीवनाचे जाण विज्ञान

माणुसकी वसू दे अंगी
करू नको पाशवी अत्याचार
मिळतील कर्माची फळे
नरकयातनेतून होशील पार

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️♠️🗯️♠️♾️♾️♾️♾️
*नरकयातना*

लिहायला लागलो चार ओळी
रडायला लागले माझे शब्द
जिवंतपणीच भोगल्या नरकयातना
अन भावनाही झाल्यात निःशब्द

नेहमीच आठवतो तो प्रसंग
मी धारण करतो मौन
काळ हेच औषध कदाचित
मग वेदना ही वाटतात गौण

काय चूक होती आमची
अचानक धरती दुभंगून जावी
पाहिले होते स्वप्न सुखाचे
त्याची एवढी किम्मत मोजावी?

उठला विश्वास नात्यावरून
इथे कोणीही नाही कुणाची
येताच प्रसंग ते पळून जाती
भूमिका निभावती फक्त बघ्याची

आता सेवाभाव ही ओसरला
मी आणि माझे कुटुंब बरे
कसा विश्वास ठेवू कोणावर
असेल का ते बोलतात तेच खरे ?

नाण्याची असते दूसरी बाजू
ऐकून घ्यायला कोणी तयार नाही
आम्हीच का द्यावी अग्निपरीक्षा
आता कुणाशी काही देणे घेणे नाही

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️♠️🗯️♠️♾️♾️♾️♾️
*नरकयातना*

रूग्णसेवेचे व्रत
तिने स्वीकारलेले
सुखी संसाराची
स्वप्न पाहिलेले

त्या काळरात्रीने तिचे
आयुष्य उध्वस्त झाले
वासनांध नराधमाने
अत्याचार केले

करकचून साखळी त्याने
गळ्याभोवती आवळली
क्षणार्धात अंधत्व येऊन
शरीराची संवेदनाच हरवली

अमानुष प्रवृत्तीची
ती शिकार बनली
अरूणा शानबाग
जीवंत शव झाली

जीवंतपणे असाह्य
मरणयातना सोसल्या
काय गुन्हा जे या जन्मी
नरकयातना भोगल्या

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️♠️🗯️♠️♾️♾️♾️♾️
*नरकयातना*

स्वर्गात तू गेलास निघून
नरकात एकटीला ठेवून
वाटली नाही कशीच खंत
पाऊल माझे झाले बघ मंद||

चहू बाजूंनी तुझेच नाती
तोडीत बघ नात्याची गाठी
कशी आवरू तुटल्या मनाला
तुझी आस भासते जीवाला||

घरटे आपुले उघडे पडले
पाखरे शोधती चहुबाजुने
कुठून आणून देऊ सांग छत
दैवानेे केला आमच्यावर घात||

दुःखाच्या यातना आहे भोगत
तुझ्याविना एकटीच सोसत
कशी सावरू बेभान मनाला
नरकयातना सांगू कुणाला||

भेटशील ना तु पैलतीरावर
सांजवेळी ये ना भूतलावर
वाट बघते तुझी रंजना
सहन होत नाही नरकयातना||

*रंजना राहुल ब्राह्मणकर*
अर्जुनी/मोर.जि. गोंदिया
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️♠️🗯️♠️♾️♾️♾️♾️
*नरकयातना*

नरकयातनेत आक्रोश असे
असह्य वेदना सोसावे लागते
याचना विनंतीला क्षमा नाही
सजा दंड हे भोगावे लागते

पडशी पोलिसांच्या पायापोटी
लावेना कोणी तुला हृदयाशी
नराधमा भोग दृष्कृत्याची फळे
दया माया गय नाही यमापाशी

अत्याचार केला लचके तोडले
अब्रु लुटुन केली बळजबरी
कारावास शिक्षा फाशी हवी
ठरला रावणाहुनी तू महाहत्यारी

आरोप्याची धिंड काढण्याचे
आदेश देते पिडिता फिर्यादी
नरकयातना भोग काळेपाणी
आजीवन व्हावी याची बरबादी

उमजल्या नाही तुला भावना
केलास प्रेमात घोर विश्वासघात
भंग केल्याचा अंतरी विवंचना
जाळला देह निर्दयी हा आघात

*प.सु.किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️♠️🗯️♠️♾️♾️♾️♾️
*नरकयातना*

आयुष्याच्या वाटेवर
वय घेते वळणे
जीवन तया म्हणे
उंच सखल चढणे ॥१॥

स्वर्ग कुणी पाहीला
तरी स्वर्गवासी होती
नरक ठाऊक कुणाला
तरी नरकयातना भोगती ॥२॥

पाप पुण्य खोटी नाव
मनुष्य जगतो कृतीन
वास्तवाशी झगडून
आस्तित्व देतो दावून ॥३॥

मनुष्य सुख शोधतो
उन्हात नरकयातना भोगत
दु:ख भरत असतो
फाटक्या रिकाम्या झोळीत ॥४॥

आम्ही आहोत तरूण
मनाला वाटेल ते करू
एक नजर फिरवून
हजार उड्या मारू ॥५॥

ही असते हल्ली भावना
कशाला आम्ही
नरकयातना भोगू
सांगाल कां तुम्ही ॥६॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️♠️🗯️♠️♾️♾️♾️♾️
*नरकयातना*

कुरुक्षेत्रावरील संघर्ष
महाकाव्यतून आहे सर्वश्रुत
आठरा दिवसांच्या युध्दात
रथी महारथी झाले मृत

कौरवांची कूटनीती ती
सत्तेसाठी होते राजकारण
नीती अनितीच्या डावपेचांनी
युद्धाचे आणले अंतिम चरण

हक्काच्या न्यायमागणीसाठी
सत्याच्या विजयासाठी
आजही चालतो हाच संघर्ष
असत्यावर मात करण्यासाठी

सूडभावना आणि वैराणे
नितिभृष्ट झाला अश्वस्थामा
पांडव वंशाच्या सर्वणाशासाठी
ब्रम्हास्त्र आणले कामा

अविचाराने वागणे ठरले
आजच्या नरकयातनेचे कारण
विद्येच्या दुरुपयोगाने अश्वत्थामाचे
आज दुर्मिळ झाले मरण.

*सौ अनुराधा भुरे,नांदेड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️♠️🗯️♠️♾️♾️♾️♾️
*नरकयातना*

कर्माची फळे,
चांगली अथवा,
खराब कशी,
कुणाचं नशीब,
कोण जाणे,
निथळल्या घामाच,
कष्टाचं पाणी ,
घराचा कर्ता पुरुष,
दिवसरात्र राबराब,
सुखदुःखाची चाळण,
स्वप्ने डोळ्यांत साठवुन,
घरातल्यांना धक्का,
विचारांची पाखरण,
मनातल्या मनात,
दरवळणारा सुगंध,
देतोय परीवारांना,
काय त्याची व्यथा,
अहोरात्र कष्ट करून,
सुखाची झोप ना डोळ्यात,
झटतो मी ह्या लेकरांना,
कष्ट करून झोळी भरेना,
सांग काय करू देवा,
किती कर्माची फळे भोगू,
सांग कुठे माझी डायरी,
नाही हिशोब माझा काय सांगू,
मागील जन्माची डायरी,
अपुरी असावी नरकयातना,
मन ना दुखविले कुणाचं,
नाही हिसकावून घेतले,
किंमत केली सगळ्यांची,
तुझा माझा विचार न करता,
आनंदाने उभे शिखर गाठले,
गळले गुडघ्याला मनगटात जोर ना,
नकोस देऊ ह्या नरकयातना..,

*सौ.नंदा नथ्थुजी कामडी, चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️♠️🗯️♠️♾️♾️♾️♾️
*नरकयातना*

सुख आणि दुःख असे
नाण्यातील बाजू दोन
सुख जरी ओंजळीत
दुःख येई सावरून

चांगले वाईट येती जीवनी
पाप पुण्य घडती हातुन
कसे घडले कुणाला ठाऊक
कर्माने सारे आपल्या कडून

कितीही चांगले वागाल
कितीही दान धर्म कराल
कुणाच्या मदतीला धावा
तरी वाट्याला भोग आलं

म्हणुन म्हण लिहून ठेवलंय
देवाघरी कोण पाहिलं काय होतं
सारकाहि आपल्याला पृथ्वीवर
नरकयातना भोगावं लागतं

शेवटी एकच करणे आहे
जगावे परी किर्ती करावे
त्या परमात्म्याचे स्मरण करू
नरकयातना ना भोगावे

*सौ पुष्पा डोनीवार,चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
💤💤💤💤🌀💤💤💤💤
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे.*
💤💤💤💤🌀💤💤💤💤

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles