महानंद डेअरी’ आता गुजरातच्या ताब्यात; हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण

‘महानंद डेअरी’ आता गुजरातच्या ताब्यात; हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मर्यादित, मुंबई अर्थात महानंद आता इतिहास जमा झालेला आहे. महानंदचा ताबा आता गुजरातमधील मदर डेअरीकडे देण्यात आला आहे. महानंदच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

मदर डेअरीला राज्य सरकार महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी 253 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजे महानंद डेअरी इतिहास जमा झाली आहे. महाराष्ट्रातील या प्रसिद्ध डेअरीवर गुजरातच्या मदर डेअरीने ताबा मिळवला आहे. मदर डेअरी ही राष्ट्रीय दुग्धविकास विकास मंडळाकडून चालवली जाते.

महानंद संस्था एनडीडीबीब म्हणजेच राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे हस्तांतरित करण्यामध्ये प्रमुख अडसर हा महानंदचे संचालक मंडळ हा होता. गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील राष्ट्रीय दुग्धविकास मंडळानं महानंदला संचालक मंडळ नको असल्याबाबतची अट घातली होती. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात महानंदचे चेअरमन राजेश परजणे यांच्यासह संचालक मंडळानं राजीनामा दिला होता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles