काय मजाक करता का रे बावा ?अख्खा संघ १२ धावात गारद; ७ फलंदाज शून्यावर बाद

काय मजाक करता का रे बावा ?अख्खा संघ १२ धावात गारद; ७ फलंदाज शून्यावर बाद



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आयपीएल 2024 मध्ये सध्या धावांचा पाऊल पडतोय. हैदराबाद संघानं (SRH) फक्त 58 चेंडूमध्ये 166 धावांचा यशस्वी पाठलाग केला. पण दुसरीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अख्खा संघ 12 धावांत तंबूत परतलाय. जपान विरुद्ध मंगोलिया सामन्यादरम्यान हा लाजीरवाना विक्रम नोंदवला गेलाय. जपानच्या भेदक माऱ्यासमोर मंगोलियाचा अख्खा संघ फक्त 12 धावांत तंबूत परतला. मंगोलियाचे सात फलंदाज शून्यावर बाद झाले. मंगोलियाच्या नावावर लाजीरवान्या विक्रमाची नोंद झाली आहे.

सात महिन्यापूर्वी मंगोलियाचा संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मंगोलियाचा संघ आशियाई क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसला होता. पण आता जपानविरोधात मंगोलियाचा संघ फक्त 12 धावांवर तंबूत परतला. हा टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात निचांकी धावसंख्या आहे. मंगोलियाच्य आधी टी20 क्रिकेटमध्ये एक संघ 10 धावांवर तंबूत परतला होता. मंगोलियाचा 12 धावांनी खूर्दा उडवत जपानने हा सामना 205 धावांच्या अंताराने जिंकला.

_फक्त 12 धावांवर मंगोलियाचा खेळ खल्लास_

मंगोलियाचा संघ सध्या जपानच्या दौऱ्यावर आहे. जपान आणि मंगोलिया यांच्यामध्ये सात सामन्याची टी20 मालिका सुरु आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात जपानने प्रथम फलंदाजी करताना सात विकेटच्या मोबदल्यात 217 धावांचा डोंगर उभारला होता. विराट धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या मंगोलियाची सुरुवातच खराब झाली. पहिल्याच चेंडूवर पहिला धक्का बसला. त्यानंतर रांगच लागली, एकापाठोपाठ एक फलंदाज तंबूत परतले. मंगोलियाच्या 11 फलंदाजापैकी सात फलंदाजांना तर खातेही उघडता आले नाही. जपानचा डावखुरा वेगवान गोलंदाज काजुमा काटो-स्टैफर्ड यानं भेदक मारा केला. त्याने 3.2 षटकात फक्त सात धावा खर्च करत पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles