राज्य आपत्ती दलास असीमकुमार गुप्ता यांची भेट

राज्य आपत्ती दलास असीमकुमार गुप्ता यांची भेटपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: मा. असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव व पालक सचिव जिल्हा नागपूर, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांनी दिनांक ०७/०७/२०२२ रोजी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर या दलास सकाळी १२.१० वाजता भेट दिली.

सदर भेटीदरम्यान राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे समादेशक तथा नियंत्रक अधिकारी मा. श्री. पंकज डहाणे, सहायक समादेशक श्री. कृष्णा सोनटक्के, पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप भजने, श्री. बादल विश्वास, वैद्यकीय अधिकारी श्री. आनंद झाडे, पोलीस उपनिरीक्षक श्री. आर के डवरे, श्री. एम जे परीहार, श्री. एस डी कराळे, जे श्री. आर जी भारद्वाज, श्री. एस पी बोंदर, श्री. एस एम सज्जनवार, श्री. डी पी कोकाटे तसेच या दलातील रेस्क्युअर पोलीस अंमलदार आदी उपस्थित होते.

या दलाचे संपूर्ण कार्यालय व परीसर यांना भेट दिली. सदर भेटी दरम्यान राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील उपलब्ध असलेले साहीत्य, साधनसामुग्री व उपकरण यांची प्रदर्शनी लावण्यात आले सदर प्रदर्शनी दरम्यान साधनसामुग्री व उपकरणाविषयी सविस्तर माहीती देण्यात आली. तसेच आगामी मान्सुन करीता या दलाने केलेल्या तयारी बाबत चर्चा करण्यात आली.

सदर चर्चेमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर येथील ०१ टिम जिल्हा गडचिरोली या ठिकाणी मान्सुन करीता तैनात करण्यात आलेली आहे. तसेच सद्यस्थितीत गटमुख्यालय नागपुर येथे ०२ कार्यकारी (अॅक्टीव) टिम व ०१ प्रशासन (अॅडमिट्रेशन) टिम सतर्क ठेवण्यात आलेल्या आहेत. व या दलाकरीता कोणकोणते साहीत्य व साधन सामुग्री तसेच उपकरण आवश्यक आहे याबाबत आढावा घेण्यात आला.

त्यानंतर राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपुर येथे मा. श्री. असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव व पालक सचिव जिल्हा नागपुर, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचे हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. सर्वात शेवटी मा. प्रधान सचिव यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपुर या दलातील पोलीस अध व अंमलदार यांचे प्रदर्शनी व वृक्षारोपन कार्यक्रम आयोजीत केल्याबद्दल अभिनंदन करुन आगामी मान्सुनमध्ये उत्तम प्रकारे कार्य करावे याबाबत शुभेच्छा दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles