
ई.डी आणि केंद्र सरकारच्या विरोधात नागपुरात युवक कॉंग्रेसचा हल्लाबोल
_जी. पी. ओ. चौकात गाडी जाडून केले विरोध प्रदर्शन_
सुबोध चहांदे, प्रतिनिधी
नागपूर: कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना वारंवार ईडी कार्यालयात बोलावून चौकशी करण्यात येत आहे. त्यांना जबरन काही प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहे. सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकार तसेच ईडीच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आणि महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे प्रभारी प्रदीप सिंधव यांच्या नेतृत्वात आज मंगळवारी (दि: २६) नागपुर येथील जीपओ चौकात गाड़ी जाळून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
दरम्यान महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे प्रभारी प्रदीप सिंधव, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या महाससचिव शिवानी वडेट्टीवार ,विदर्भतील सर्वे जिल्हा अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यानी जीपीओ चौकात सरकार विरोधात नारे निदर्शन व धरणे देत रास्ता रोको केला. दरम्यान केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाही देण्यात आल्या. यावेढी चौकातील चौतर्फा वाहतूक खोळमबली होती. पोलिस विभागाला माहिती मिळताच पोलिसांचा मोठा ताफा येथे दाखल झाला आणि कुणाल राऊत, प्रदिप सिंधव, शिवानी वडेट्टीवार यांच्यासह युवक कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक केली.
आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेसचे उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेसचे महासचिव श्रीनिवास नालमवार, शिवानी वडेट्टीवार, अनुराग भोयर, आसिफ शेख, पकंज सावरकर, निलेश खोब्रागडे, निशाद इंदुरकर, वसीम खान, रोनक चौधरी, शिलाज पांडे, साईश वारजुकर, डॉ. प्रणित जांभुळे, दुर्गेश पांडे, संतोष खडसे फैजल कुरैशी वैभव सरनाईक, जयसेन सरदार, सुरज कन्नूर, तेजस जिचकर, राज संतापे, आकाश गुजर, फिरोज शाह, रिजवान बेग तसेच विदर्भातील युवक काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष व युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.