धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या प्रयत्नाला यश-आरोपी संदीप पौनीकर बडतर्फ

धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या प्रयत्नाला यश-आरोपी संदीप पौनीकर बडतर्फ



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

नागपूर :- धनगर अधिकारी कर्मचारी संघटना नागपूर, महाराष्ट्र राज्य कडून श्री. नविनचंद्र रेड्डी साहेब अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पोलीस भवन नागपूर यांना प्रत्यक्ष भेटून पोलीस कर्मचारी राधा पडवे वर झालेल्या जीवघेन्या हल्याबाबत निवेदन देण्यात आले होते, या बाबत मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली, मा. अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) यांनी लगेच फोन करून श्रीमती राधा पडवे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन संपूर्ण चौकशी करण्यात यावी त्याची माहिती लगेच पोलीस आयुक्त कार्यालयाचला कळवावे असे आदेश गिट्टीखदान पोलीस स्टेशन ला देण्यात आले, त्यावर गिट्टीखदान चे वरिष्ठ अधिकारी विम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेऊन पेशंट विषयी संपुर्ण माहिती घेण्यात आली, तसेच राधा पडवे मॅडम याच्या क्वार्टर ला पोलीस संरक्षण देण्यात आले होते.तसेच आरोपीला लाल बिल्डींग नंबर ५ येथील क्वार्टर १४२ खाली करायचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. आणि आरोपी संदिप पॊनिकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, त्याला बडतर्फ करण्यात येईल असा लवकरच निर्णय घेण्यात येणार अशी माहिती संघटनेचे शिष्टमंडळ ला दिली.

त्यावर कार्यवाहीचे आदेश दि. २७/०७/२०२२ ला अमितेश कुमार पोलीस आयुक्त नागपूर समक्ष प्राधिकरण यांनी भारतीय संविधानाच्या कलम 311 (2) बी अन्वये श्री .पौनीकर यांना सेवेतून बडतर्फ चे आदेश काढले आहे. आरोपी संदीप पौणिकर यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. धनगर अधिकारी कर्मचारी संघटने कडून पोलीस कर्मचारी राधा पडवे यांना न्याय मिळून देण्यास यश प्राप्त झाले.

पोलीस कर्मचारी राधा पडवे याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता त्यानी तक्रार पोलीस स्टेशन गिट्टी खदान नागपूर येथे दिली होती, ती तक्रार दडपू नये याकरिता सर्व पेपरला न्यूज लावून प्रसारित करण्यात आले होते . आणि पोलीस केस अजून मजबूत करण्यात आली होती.अशी माहिती यशवंत कातरे
नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष
धनगर अधिकारी कर्मचारी संघटना नागपूर यांनी प्रसिद्ध माध्यमाला दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles