
राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी तर्फे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किसान सेल पदी संतोष मेश्राम
गजानन ढाकुलकर
नागपूर :- राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी न्यु दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात २६ जुलै २०२२ रोजी, पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष पशुपतीकुमार पारस, केंद्रीय खाद्य प्रसारण उद्योग मंत्री, यांच्या हस्ते नागपूरचे संतोष आत्माराम मेश्राम यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किसान सेलपदी नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी केंद्रीय कार्यालय दिल्ली येथे यांची निवड करण्यात आली तेव्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची लहर आली आहे. संतोष मेश्राम हे अनेक वर्षापासून स्वतःची शेतकरी संघटना चालवत होते. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनवर होणाऱ्या अन्याया विरोधात अत्याचार विरोधी न्याय देण्याकरिता आंदोलने, चक्काजाम व न्यायालयीन प्रकरण दाखल करून त्यांच्या मार्फत अनेक सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करून अनेकांना न्याय मिळवून दिला.
म्हणूनच त्यांची राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीवर निवड करण्यात आली. किसान सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष गुप्तेश्वर राय यांच्या अध्यक्षतेखाली पार्टीच्या वतीने त्यांना प्रमाणपत्र देऊन व स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सलीम काजी, रवींद्र भोयर, भिवगडे साहेब व अन्य मान्यवर उपस्थित होते.