मराठा समाजाचा चेहरा हरपला; विनायक मेटेंचे अपघाती निधन

मराठा समाजाचा चेहरा हरपला; विनायक मेटेंचे अपघाती निधनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुणे: मुंबई द्रूतगती महामार्गावरून मुंबईला जात असताना आज पहाटे पाच वाजता दरम्यान खापोली बोगद्याजवळ गाडीच्या काही तांत्रिक बिघाडामुळे शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांचं घटनास्थळीच अपघाती निधन झालं. त्यांना एक तास कुठलीही मदत मिळाली नाही नंतर त्यांना पनवेल मधील एम.जी.एम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. स्वबळावर राजकारणात त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला होता. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सतत ते लढत होते आजही याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात जाण्यासाठी निघाले होते.

अशा या झुंजार नेत्याचे डोक्याला गंभीर मार लागून अपघाती निधन झाले. त्यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी बीडला नेण्यात येणार आहे . मराठा समाजातील आरक्षणाची बैठक आज रद्द करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा अपघातस्थळी अधिक कसून तपास सुरू आहे.

याप्रसंगी हाॅस्पीटलमधे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मराठा समाजाच्या आंदोलनासाठी सुरू असलेल्या लढ्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे. तुम्ही आणि फडणवीस दोघे आहात तर मराठा समाजाला आता नक्कीच न्याय मिळेल असं ते तीन दिवसांपूर्वीच माझ्याजवळ बोलले होते असे मुख्यमंत्री शिंदे याप्रसंगी म्हणाले .छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक बनावं म्हणून त्यांची धडपड सुरू होती . अशा या झुंजार नेत्याला मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्याचप्रमाणें उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे व अजित पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. असा मराठा समाजाच्या आंदोलनाचा बुलंद आवाज हरपला त्यामुळे देशभरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles