धक्कादायक..!! बुलडाणा जिल्ह्यात एकाच दिवशी ६ मुली बेपत्ता

धक्कादायक..!! बुलडाणा जिल्ह्यात एकाच दिवशी ६ मुली बेपत्ता



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शेगाव तालुक्यातून ३ महिन्यात २७ महिला व मुली बेपत्ता_

बुलढाणा: विदर्भात सातत्याने विविध कारणासाठी चर्चेत असणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यात आता एक मोठी चिंता निर्माण झाली आहे.आणि ते म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.या बुलढाणा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली बेपत्ता असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.

त्या पार्श्वभूमीवर आता बुलढाणा जिल्हातूनही एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार जिल्ह्यातून गेल्या तीन महिन्यात तब्बल २०० च्या महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. यामध्ये एकट्या शेगाव शहर व तालुक्यातून २७ मुलीचा समावेश आहे.

संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातून १ ते २२ सप्टेंबर या कालावधीत ५५ जण बेपत्ता झाले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक २९ मुली व २६ पुरुषांचा समावेश आहे. ५५ पैकी ३९ जण १८ ते ३० वयोगटातील आहेत. बेपत्ता होणाऱ्यांमध्ये अविवाहित तरुणी, विवाहित महिला व विवाहित पुरुषांचा देखील समावेश आहे. दरम्यान, २३ सप्टेंबर रोजी चार मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यामध्ये शेगाव तालुक्यातिल तीन तरुणी व एका विवाहित महिलेचा समावेश आहे.

खामगाव तालुक्यातील शिरजगाव देशमुख येथून १९ वर्षीय नेहा कैलास खंडेराव ही बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी तिच्या आई- वडिलांनी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील देवखेड येथून १८ वर्षीय अनुराधा विष्णू सरकटे ही तरुणी शेगाव तालुक्यातून कु. सानिका (१९) व कु. मयुरी (१९) या सख्ख्या चुलत बहिणी बेपत्ता झाल्या आहे. याच तालुक्यातील नसिराबाद येथून मनीषा कृष्णा राठोड वय १८ ही युवती बेपत्ता झाल्याची नोंद सिंदखेडराजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. यासोबतच बुलडाणा तालुक्यातील हतेडी बु. येथून कोमल पुरुषोत्तम जेठे ही तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या तरुणी कोठे दिसल्यास आपल्या जवळच्या पोलिस ठाण्यात कळवावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles