ज्येष्ठ कवयित्री व कथालेखिका वृंदा करमरकर यांना ‘साहित्यगंध’ पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ कवयित्री व कथालेखिका वृंदा करमरकर यांना ‘साहित्यगंध’ पुरस्कार प्रदान



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_हा सन्मान मला माझ्या माहेरचा वाटतो; वृंदा करमरकर_

सांगलीः नागपूर येथील मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेतर्फे देण्यात येणारा यंदाचा साहित्यगंध पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री, साहित्यिका, लेखिका व कथाकार वृंदा करमरकर यांना मराठीचे शिलेदार समूहाच्या कवयित्री पूनम माळी सांगली यांच्या हस्ते करमरकर यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह,पदक, दीपोत्सव अंक आणि मानपत्र यांचा या पुरस्कारात समावेश आहे.

याप्रसंगी वृंदा करमरकर म्हणाल्या, आपल्या शिलेदार संस्थेतर्फे माय मराठीच्या विकास आणि संवर्धनासाठी सातत्याने भरीव प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध उपक्रम घेतले केले जातात. समाजातील साहित्यिक, लेखक, कवी,पत्रकार आणि आदर्श शिक्षक यांना दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करून गौरविण्यात येते.तसेच लेखनासाठी सर्वांना प्रोत्साहन देण्यात येते.

या संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष आदरणीय राहुल पाटील यांच्या अथक प्रयत्नांतून संस्थेचे कार्य आणि कीर्ती सर्वदूर पसरत आहे. साहित्यगंध दीपोत्सव अंकात ‘नात्याची डस्टबीन्स’ ही सत्य घटनेवर आधारीत कथेचा समावेश आहे. हा सन्मान मला माझ्या माहेरचा वाटतो. काही कारणात्सव मला लातूर येथे उपस्थित राहता आले नसल्याची खंतही वृंदा करमरकर यांनी व्यक्त केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles