‘चेतन कवळते’ साहित्यगंध उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित
नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेतर्फे यंदा मराठवाडा विभागतील लातूर नगरीत साहित्यगंध दीपोत्सव अंकाचा भव्यदिव्य प्रकाशन समारंभ नुकताच लातूर येथील रेड क्रास भवनात थाटात संपन्न झाला.
नागपूर येथील बँक कर्मचारी असलेल्या चेतन कवळते यांना सपत्निक लातूर येथील राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात दूरदर्शन प्रतिनिधी दीपरत्न निलंगेकर व संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते यंदाचा ‘साहित्यगंध उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह, मेडल व अंक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.