
“रूणूझुणू पैंजणाची”
पैंजण तुझे
हाती घेऊन
किती नाचलो मी…|| धृ ||
रूणूझुणू पैंजणाची
एकटा असता
चोरून ऐकली मी//१// पैंजण….
मऊ मऊ
स्पर्श गालावरती
किती आनंदलो मी //२// पैंजण….
खड्यांमधून
विखूरणाऱ्या किरणांशी
किती खेळलो मी //३// पैंजण….
ओठावरती,नाकावरती
कधी गालावरती
पैंजण फिरवले मी //४// पैंजण….
वेड्या मनाची
वेडी आशा
किती कल्पीली मी //५// पैंजण….
रूणूझुणू पैंजणाची
वाजवून खेळून
किती गहिवरलो मी //६// पैंजण….
पैंजण तुझ्या
पायी घातले
स्वप्नी पाहिले मी //७// पैंजण….
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड