
Schuartz’s Greenhouse रोपवाटिकेला भेट
वसुधा नाईक थेट युएसएहून
आज दि.13/05/2023 Schuartz’s Greenhouse ला भेट दिली. अनेक रोपे पहिली. जी फक्त चित्रात पहिली होती.ती रोपे प्रत्यक्ष पहिली, हाताळली. किती विविध रंग होते. अगणित रंग पाहून, छोटी विविध फुले पाहून अगदी डोळ्याचे पारणे फिटले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
फुलांचा तो मवूमुलायम स्पर्श मनाला आनंद देत होता. या रोपवाटिकेतून आज खूप रोपे आणली. इथे उन्हाळ्यात फुलझाडे लावतात ती आठ महिने छान टिकतात. हिवळ्यात ती अती थंडीमुळे कोमेजून जातात.
मग आता ही फुलझाडे लावून मस्त वाढतील. त्याचा आनंद खूप छान मिळतो. रोप लावण्यासाठी आधी जुन्या कुंड्या नीट भराव्या लागतात. मग रोपे लावून त्याची निगा ठेवावी लागते. माळी काम सर्व करावे लागते. पण एकदा का बाग फुलली की आहाहा… नयन रम्य सुखद अनुभव असतो.