
बोबडे बोल
आठवतात मज बाळाचे
लाडाने,फुगवलेले गाल,
कानी गुंजारव घालतात
लाडक्याचें, बोबडे बोल.
कानात जतन करते
त्यांचे अडखळीत बोल,
सुरुवातींलाच,शब्द आई
बोलतो,लडिवाळ बाल.
त्याच्या, बोबड्या सुरात
आकाश ठेंगणे वाटे,
अखंड,विश्वातील ज्ञान
त्याच्या पुढे फिके वाटे.
बोबड्या वाणीने
सारे घर आनंदले,
पायीच्या पैजणांने
सारे घर निनादले.
बाललीला, तूझ्या अवखळ
मीं ,हृदयात साठविते,
आठवणी ह्या,अनमोल
मीं,जतन करून ठेविते.
अमृताचा वृषाव जणू
माझ्या,अंगणात होतो,
बोबड्या, वाणीतूनी जणू
बाळ गंधर्वच,बोलतो.
साद तुझी, येता आजहीं
होते मन,कावरे बावरे,
परसबागेतल्या गोठ्यातूनी
हंबरतीं जणू ,गाईचे वासरे.
तुझ्या बोबड्या वाणीनें
सारे घर,सुखावलें
‘आईबाबा’ हें अनमोल पद
तुझ्या,आगमना मुळे लाभले.
मायादेवी गायकवाड
मानवत, परभणी
=========