
इतिवृत्त
घेतला पेन हाती
आला मनी विचार
काय लिहू इतिवृत्त
आयुष्याचे सोपस्कार
इतिवृत्त जगण्याचे
कि जगतांना लढण्याचे
बळ देऊन जाणाऱ्या
कठीण कातळ प्रश्नांचे
सारखा एक विचार
असे झाले नसते तर
बरे झाले असते पाऊल
पुढे टाकले नसते जर
संध्याकाळ आली तरी
इच्छा काही सरत नाही
राहीलेत कि प्रश्न अजून
उत्तर अजून मिळत नाही
कर्म माझे फळही माझे
चुकले निर्णय खूप काही
कणखर झाले दणक्याने
बळकटी आली नवल नाही
पाय जमिनीवर तरीही
बोल लावणे थांबत नाही
कितीही चाला जपून
काटे रूतल्याविना राहत नाही
सविता धमगाये
नागपूर
जि. नागपूर