
हिंगण्याच्या मोहगाव झिल्पी तलावाने घेतला पाच तरूणांचा जीव
नागपूर: हिंगणा तालुक्यातील प्रसिध्द पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणा-या मोहगाव येथील ‘झिल्पी’ सरोवरात दि २ जुलै रोजी मन हेलावणारी दुर्घटना घडली असल्याची माहिती प्राप्त झाली. नागपूर शहरापासून ३० किलो मीटर अंतरावरील मोहगाव झिल्पी तलावात बुडून रविवारी पाच तरूणांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी येथे ही दुर्घटना घडली. तलावात बुडून मरण पावलेल्यांमध्ये नागपुरातील पाच युवकांचा समावेश आहे. एक युवक बुडत असल्याचे पाहून त्याचे पाच मित्र एका मागे एक त्याला वाचविण्यासाठी धावले. मात्र त्यांचाही बुडून मृत्यू झाला. दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिस आणि बचाव पथक तलावावर पोचले. पथकाने अथक प्रयत्न करून तलावात बुडेलेल्यांचे मृतदेह बाहेर काढले. रात्रीपर्यंत ही शोध मोहीम सुरू होती. पुढील तपास हिंगणा पोलीस करीत आहे.