
रस्त्याच्या नित्कृष्ट दर्जाचे कामामुळे चिखलाचे साम्राज्य; नागरिकांचा जीव धोक्यात
बेलोरा- पुसद तालुक्यातील मारवाडी,बेलोरा बु ते पांढुर्णा केदार्लिंग मार्गे हिंगोली 214 क्रमांक राज्यमार्ग असून हा रस्ता विदर्भ व मराठवाडयाला जोडणारा अतिशय रहदारी चा रस्ता असून अनेक नागरिक नांदेड, परभणी ,हिंगोली येथे नियमित ये-जा करत असतात. रस्त्याचे नित्कृष्ट दर्जाचे काम व कुठल्याही प्रकारचे नियोजन न केल्यामुळे दोनच वर्षांत रस्त्याची अवस्था दयनीय झालेली असून बरेच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत.
जागोजागी चिखलाचे स्तर साचलेले आहेत. सध्या पावसाचे दिवस असून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या बाजूने ने कुठल्याही प्रकारच्या नाल्या न काढल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्याने वाहताना दिसून येत आहे.पावसाच्या पाण्याने शेतातील वाहून आलेली माती मुळे रस्तावर जागोजागी चिखलाचे स्थर साचलेले आहेत त्यामुळे दुचाकी वाहने घसरुन अपघात होत आहेत.
विदर्भ व मराठवाडाचे सीमेवर असलेले गाव पांढुर्णा केदरलींग येथे महादेवाचे जागरूक देवस्थान मंदिर असून महाराष्ट्र भरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात . काल दिनांक 17/7/2023 रोजी अधिक श्रावण मासातील सोमवती आमवस्या असल्यामुळे मराठवाडा व विदर्भातील दूरदूर वरून हजारो भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते. रस्त्याच्या नित्कृष्ठ दर्जाच्या कामामुळे जागोजागी रस्त्यावर चिखल माती साचल्याने जवळपास 100 ते 125 भाविकांच्या दुचाकी घसरून अपघात झाले आहेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
पावसाचे दिवस असल्याने रोजच अपघाताची मालिका सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीत लक्ष देऊन रस्त्यावर पावसाच्या पाण्याने साचल्यालेली चिखल माती काढण्यात येऊन रस्ता मोकळा करण्यात यावा .भविष्यात अपघात होऊन जीवित हानी होऊ शकते त्यामुळे रस्त्याच्या बाजूला पाणी जाण्यासाठी दोन्ही बाजूच्या नाल्याचे नियोजन करून नागरिकांचे होणारे हाल थांबवावे… जेणेकरून भविष्यातील होणारी जीवित हानी होणार नाही लवकरात लवकर नाल्याचे काम करण्यात आले नाही तर नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत..